राज्यसभा निवडणुकीसाठी सर्व पक्षांची धावपळ सुरू आहे. शिवसेना पक्षाची प्राण प्रतिष्ठा पणाला लागल्यामुळे सर्व पक्ष आमदारांना हॉटेलमध्ये ठेवण्यात आले होते. जे इतर छोटे पक्ष व अपक्ष आमदार सरकारला समर्थन करत आहे त्यांच्याशी संपर्क साधला जात आहे. या पार्श्वभूमीवर मंगळवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेने सोबत इतर आमदारांची ही बैठक घेतली.
मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या बैठकीला प्रहार क्रांती संघटनेचे अध्यक्ष आणि राज्यमंत्री बच्चू कडू यांनी सुट्टी मारली. त्यामुळे शिवसेनेला टेन्शन आले आहे. बच्चू कडू यांच्या सोबत त्यांच्या संघटनेचे दोन आमदार ही आहेत. कडू यांनी धान आणि हरभरासाठी अनुदानाची मागणी केली होती. याविषयावर त्यांनी नुकतेच वक्तव्यही केलं होतं.
मुख्यमंत्र्यांच्या घेतलेल्या राज्यसभा निवडणुकीच्या बैठकीला नाराज आमदार आशिष जैस्वाल उपस्थित होते. त्यामुळे शिवसेनेला आनंदच झाला होता. त्याचप्रमाणे या बैठकीला शंकरराव गडाख चंद्रकांत पाटील,नरेंद्र भोंडेकर, राजेंद्र पाटील यड्रावकर,नीता जैन, मंजुळा गावीत, किशोर जोरगेवार हे आमदारही उपस्थिती असल्याचे समजते. जवळ जवळ 55 आमदार या बैठकीला उपस्थित असल्याची माहिती आहे.
अबू आझमीही गैरहजर :-
समाजवादी पक्षाने एक तिढा निर्माण केला होता. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अबू आझमी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहिलं होत. या पत्रावर उत्तर आल्याच्यानंतर विचार करू, असंआझमींनी सांगितलं आहे. तसेच पक्ष प्रमुख अखिलेश यादव हे निर्णय घेतील असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
राज्यसभा निवडणूक संदर्भात महाविकास आघाडीच्या आमदारांची बैठक होणार होती.व या बैठकीला न जाण्याचा निर्णय अबू आझमी यांनी घेतला होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरें यांनी आझमी यांना फोनही केला होता. पण, आझमी यांनी त्यांनी काही उत्तर दिले नाही. भाजप सुद्धा आझमी यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न करत आहे. याविषयी बोलताना आझमी म्हणाले की, “शिवसेनेनं आमच्या मागण्या पूर्ण केल्या नाहीत त्याचसोबत अडीच वर्षात शिवसेनेने आमच्या साठी काय केलं?. त्यामुळे आम्ही महाविकास आघाडीच्या या आमदारांच्या बैठकीला जाणार नाही.”
राज्यसभेची निवडणूक एकूण सहा जागांसाठी होत आहे. विधापरिषदेतील पक्षा पक्षातील जोर पाहता भाजप 2 तर काँग्रेस राष्ट्रवादी व शिवसेना यांना प्रत्येकी एक जागा अगदी सहजपणे जिंकता येऊ शकते