आज दुपारी 1 वाजता महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (HSC) परीक्षा म्हणजेच 12 वीचा निकाल जाहीर केला. महाराष्ट्रात बारावी परीक्षेसाठी एकूण 14,85,191 विद्यार्थ्यांची नोंदणी होती. यामध्ये मुलींची संख्या 6,68,003 आणि मुलांची संख्या 8,17,188 इतकी होती.
यंदाही मुलींनी मारली बाजी :-
यंदा राज्यातील बारावीच्या विद्यार्थ्यांची उत्तीर्णतेची टक्केवारी 94.22 % आहे. मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी 95.35% इतकी होती तर मुलांची एकूण टक्केवारी 93.29% होती.ही आकडेवारी लक्षात घेता महाराष्ट्रात यंदाही मुलींनी बाजी मारल्याचे दिसून येत आहे. HSC बोर्डाच्या 12वीच्या निकालाची 14 लाखांहून अधिक मुले व त्यांचे पालकही वाट पाहत होते, त्याचवेळी आज दुपारी 1:00 वाजेपासून विद्यार्थ्यांनी सरकारने दिलेल्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन त्यांचे निकाल बघितले.
या परीक्षेला बसलेले सर्व विद्यार्थी या वेबसाईट वर आपला निकाल बघू शकतात.
www.mahresult.nic.in
www.hscresult.mkcl.org
www.hscmahresult.org.in
अशा प्रकारे मोबाईलवर निकाल पाहू शकतात :-
महाराष्ट्र बोर्ड इंटरमिजिएटचा निकाल मोबाईलवरही पाहता येतो, त्यासाठी तुम्हाला तुमच्या मेसेज बॉक्समध्ये MHHSC सोबत तुमचा रोल नंबर टाईप करावा लागतो , त्यानंतर 57766 या नंबर वर पाठवावे लागेल,त्यांनतर बोर्डाचा निकाल तुमच्या फोनवर येईल.
निकाल तपासण्यासाठी सोपी प्रक्रिया :-
1. सर्वप्रथम, महाराष्ट्र बोर्डाच्या अधिकृत वेबसाइट mahresult.nic.in ला भेट द्या व त्यावर क्लिक करा.
2. येथे मुख्यपृष्ठावर महाराष्ट्र HSC 2022 निकालावर क्लिक करा.
3. या विंडोमध्ये दिलेल्या जागेत रोल नंबर आणि आईचे नाव समाविष्ट करा.
4. आता ‘परिणाम पहा’ या बटणावर क्लिक करा.
5. तुमच्या स्क्रीनवर महाराष्ट्र HSC निकाल 2022 दिसेल.
6. त्यांनतर निकाल डाउनलोड करून तुम्ही प्रिंट काढू शकतात .
उत्तीर्ण होण्याचे सर्वाधिक प्रमाण :-
पुणे: 93.61%
नागपूर : 96.52%
औरंगाबाद : 94.97%
मुंबई: 90.91%
कोल्हापूर : 95.07%
अमरावती: 96.34%
नाशिक : 95.03%
लातूर : 95.25%
कोकण: 97.21%