जळगाव राजमुद्रा दर्पण | महाराष्ट्र विधान परिषदेची उमेदवारी राष्ट्रवादीचे नेते एकनाथराव खडसे यांना जाहीर झाल्यानंतर मुक्ताईनगर सह जळगावात खडसे समर्थकांनी मोठ्या प्रमाणात जल्लोष केला आहे यावेळी पेढे व फटाके फोडून आनंदोत्सव साजरा करण्यात आला आहे खऱ्या अर्थाने आमच्या नेत्याला राष्ट्रवादीमध्ये न्याय मिळाला असे खडसे समर्थकांकडून समाधान व्यक्त केले गेले आहे. गेल्या अनेक वर्षापासून राजकीय प्रभावाबाहेर खडसे यांचा संघर्ष सुरू होता गेल्यावर्षी खडसे यांनी शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला होता यावेळी त्यांचे पुनर्वसन करण्यात येईल असे देखील सांगितले गेले होते त्यानुसार राष्ट्रवादी काँग्रेस कडून शब्दांची जाण ठेवत विधान परिषदेची उमेदवारी खडसे यांना बहाल करण्यात आली आहे. नाराज असलेले खडसे समजतात पुन्हा एकदा जल्लोषपूर्ण वातावरणात न्हाऊन निघाले आहे आमदारकी तर मिळाली मात्र मंत्रिपदावर लवकरात लवकर वर्णी लागावी अशी मागणी खडसे समर्थकांकडून करण्यात आली आहे.