जळगाव राजमुद्रा दर्पण | जळगाव जिल्ह्यातील ओबीसी समाजाला खऱ्या अर्थानं न्याय मिळाला व खडसे यांची विधान परिषदेची उमेदवारी भाजपमधील अंतर्गत विरोधकांना चपराक आहे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाला उत्तर महाराष्ट्रात राष्ट्रवादीचे नेते एकनाथराव खडसे यांना विधान परिषदेवर संधी दिल्याने नवसंजीवनी मिळणार आहे. भाजपचा वटवृक्ष म्हणून खडसे यांच्याकडे पाहिले जात होते, मात्र भाजपमध्ये अन्याय झाला पण कुठल्याही अटी शर्यती शिवाय राष्ट्रवादीत गेल्याने शरद पवार साहेबांनी एकनाथराव खडसे यांना न्याय दिला आहे. अशी प्रतिक्रिया खडसे यांचे कट्टर समर्थक असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे महानगराध्यक्ष अशोक लाडवंजारी यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे.
भाजपमध्ये खडसेंवर मोठ्या प्रमाणात अन्याय झाला त्या अन्याय करणाऱ्यांना मोठी चपराक म्हणून खडसे यांना विधान परिषदेची उमेदवारी असल्याचे ते यावेळी म्हटले आहे. वर्षानुवर्ष लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या सोबत नाथाभाऊ खडसे यांनी काम केले भाजपकडून नेहमी अन्याय करण्यात आला मात्र राष्ट्रवादी प्रवेशानंतर खऱ्या अर्थानं विधान परिषदेची उमेदवारी देऊन न्याय मिळाला असल्याची भावना जळगाव येथील खडसे समर्थकांनी व्यक्त केली आहे.
शहरातील जिल्हा राष्ट्रवादी कार्यालय परिसरात राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांकडून खडसे यांना विधान परिषदेची संधी मिळाल्याने पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला आहे.
एकनाथराव खडसे यांची भाजपकडून उमेदवारी कापण्यात आली त्या दिवसापासून मोठ्या प्रमाणात खडसे यांचा संघर्ष पक्षांतर्गत सुरू झाला. पक्षामध्ये त्यांच्यासोबत मोठ्या प्रमाणात दुजाभाव झाला असल्याची भावना त्यांनी वेळोवेळी व्यक्त केली. “माझीच उमेदवारी नाही कापली तर कन्या असलेल्या रोहिणी खडसे यांचा पराभव करण्यासाठी भाजपमधील अंतर्गत विरोधकांनी पुरवठा केला असल्याचा आरोप देखील खडसे यांनी केला होता.
यामध्ये त्यांनी थेट राज्याचे विरोधी पक्षनेते व तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच भाजपचे नेते माजी मंत्री गिरीश महाजन यांच्या मुळे माझे राजकीय भवितव्य अडचणीत आले असा खळबळजनक आरोप करून त्यांनी राज्यभरात खळबळ उडवून दिली होती. भाजप मध्ये असताना पक्ष सोडण्याची पत्रकार परिषदेत ते अक्षरशः भावुक झालेले दिसून आले, पक्ष सोडण्याची माझी इच्छा नसून मात्र भाजपमधील काही अंतर्गत विरोधकांच्या कुरु घोड्यांना कंटाळून भाजपा सोडत असल्याचे त्यांनी सांगितले होते. तसेच मुंबई येथे राष्ट्रवादीत जाणार असल्याचे त्यांनी जाहीर केले होते. मात्र राष्ट्रवादीत जाऊन वर्षे उलटल्यावर त्यांना विधान परिषदेची उमेदवारी मिळाली आहे. त्यामुळे खडसे पुन्हा एकदा राजकीय प्रवाहात स्थिर होणार आहे.