मुंबई राजमुद्रा दर्पण | भाजपा ने नेहमी आश्वासनं देऊन गाजर दिले, म्हणून राष्ट्रवादी द्यावे लागले. विधान परिषदेच्या उमेदवारीचा अर्ज भरल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते एकनाथराव खडसे यांनी माध्यमांशी संवाद साधत असताना राष्ट्रवादीत का यावं लागलं ? याबाबत आपली खंत व्यक्त केली आहे. अनेक वेळा राज्यपाल करून टाकू असे सांगितले होते, स्वतः याबाबत तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जळगावात भेटले होते. मात्र भाजपमध्ये अन्याय झाल्याची भावना निर्माण झाली. त्यामुळे नाईलाजाने भाजप मधून पक्ष त्याग करावा लागला असे एकनाथराव खडसे माध्यमांशी बोलताना म्हटले आहे.
पक्षवाढीसाठी चाळीस वर्ष निष्ठेने काम केले, राज्यसभेच्या निवडणुकीच्या वेळेस देखील उमेदवारीचे आश्वासन भाजपाच्या पक्षश्रेष्ठींनी दिले मात्र ऐनवेळेस भागवत कराड यांचे नाव पुढे करून माझी उमेदवारी कट करण्यात आली. राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर कोणतीही अट किंवा शर्यत नव्हती मात्र राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी माझ्यावर विश्वास ठेवला हा विश्वास सार्थ करण्यासाठी मी प्रयत्न करणार असल्याचे खडसे म्हटले आहे. आमच्या भागामध्ये बीजेपी वाढण्यासाठी संपूर्ण आयुष्य काढले मात्र आता यापुढे राष्ट्रवादीचा विस्तार करण्यासाठी काम करेल असे देखील खडसे म्हटले आहे.
राजकीय जीवनामध्ये अनेक चढ-उतार पाहिले अनेक संघर्षाचा काळ आता मागे गेला आहे. आमदारकीचे कौतुक नाही मात्र संकटाच्या काळात व संघर्षाच्या काळात भाजपने बाहेर ढकललं व राष्ट्रवादीने साथ दिली, अडचणीच्या काळात साथ देणे महत्त्वाचे असते ते काम राष्ट्रवादीने केले आहे. यापुढे संघटनात्मक बांधणीसाठी संपूर्ण राज्यभर काम करेल असा विश्वास राष्ट्रवादीचे विधान परिषदेचे उमेदवार व माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी व्यक्त केला आहे.