राज्यात सध्या कडक निर्बंध लागू करण्यात आलेले आहेत. 7 ते 11 या वेळेत अत्यावश्यक सेवा वगळता सर्व बाजारपेठा आणि व्यवसाय बंद करण्यात आले आहेत. अशात कोरोनाची सध्याची परिस्थिती पाहता केंद्र सरकारकडून देशव्यापी लॉकडाऊनचा इशारा दिला जात आहे. ‘देशात लॉकडाऊन करण्याचा अधिकार केंद्र सरकारचा असून याबाबत केंद्राने काही निर्णय घेतल्यास राज्य सरकार केंद्राच्या या आदेशाचे पालन करणार’ असे विधान राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी आज जालन्यात केले.
लसी संदर्भात पूनावालांना विनंती
लसी संदर्भात बोलतांना कोविशिल्ड लसीची निर्मिती करणाऱ्या सिरीम इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष अदर पूनावाला हे पुण्यात रहिवासी असल्याने त्यांनी महाराष्ट्राची लसीकरणाची समस्या लक्षात घेऊन महाराष्ट्राला झुकते माप देण्याची विनंती केली आहे. सध्या महाराष्ट्रात 18 ते 44 वयोगटातील लसिकरणाचा प्राथमिक स्थरावर सुरुवात झाली असून काहीसा तुटवडा निर्माण झाला आहे. ही परिस्थिती लक्षात घेता आरोग्यमंत्र्यांनी ही विनंती केली असल्याचे लक्षात येते.