गृह मंत्रालयाने प्रशासन अधिकारी, मुख्य पर्यवेक्षक/सल्लागार, कायदा अधिकारी , पर्यवेक्षक/सल्लागार या पदांसाठी अर्ज मागवले आहेत. ही भरती कस्टोडियन ऑफ एनीमी प्रॉपर्टी फॉर इंडिया ऑफिस (CEPI) च्या तीन शाखांसाठी केली जात आहे – मुंबई, कोलकाता आणि लखनौ. या पदांसाठी कंत्राटी पद्धतीने भरती होणार आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 24 जून 2022 आहे.
गृह मंत्रालय भरती 2022 रिक्त जागांचा तपशील :-
कायदा अधिकारी ग्रेड I (सल्लागार) (उपसचिव/संचालक) – 2 पदे
कायदा अधिकारी ग्रेड II (सल्लागार) – 2 पदे
प्रशासकीय अधिकारी – 1 पद
मुख्य पर्यवेक्षक/सल्लागार – 3 पदे
पर्यवेक्षक/सल्लागार – 3 पदे
सर्वेक्षक- 26 पदे
तुम्हाला पगार किती असेल :-
कायदा अधिकारी ग्रेड I (सल्लागार) (उपसचिव/संचालक) – 60000
कायदा अधिकारी ग्रेड II (सल्लागार) – 35000
प्रशासकीय अधिकारी – 45,000/-
मुख्य पर्यवेक्षक/सल्लागार – 60,000/-
पर्यवेक्षक/सल्लागार – 40,000
सर्वेक्षक – 225,000
अत्यावश्यक शैक्षणिक पात्रता :-
कायदा अधिकारी श्रेणी- उमेदवारांकडे पाच वर्षांच्या सरावासह कायद्याची पदवी असावी. तसेच संगणकाचे कामकाजाचे ज्ञान असावे.
प्रशासकीय अधिकारी – समतुल्य शासकीय पदावरून निवृत्त झालेले असावे. प्रशासन आणि लेखाविषयक बाबींचाही अनुभव असावा.
मुख्य पर्यवेक्षक/सल्लागार- महसूल/मालमत्ता प्रकरणांमध्ये अनुभव असलेले DS किंवा US.
पर्यवेक्षक/सल्लागार- MBA/BBA. तसेच, एमएस ऑफिसचे कामकाजाचे ज्ञान असावे.
सर्वेक्षक- 12वी विज्ञान प्रवाह (गणित हा विषय असावा) 60% गुणांसह.
अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 जून आहे.