जळगाव राजमुद्रा दर्पण | जळगाव जिल्ह्याचे माजी पालकमंत्री गिरीश महाजन यांचे स्वीय सहाय्यक अरविंद देशमुख यांनी चक्क फेसबुक वर पोस्ट टाकत राज्यसभा निवडणुकीचा निकाल पूर्णपणे भाजपच्या बाजूने लागेल असा दावा केला आहे. यासाठी त्यांनी एक लाखाची पैज लावण्याची तयारी दर्शवली आहे. एक लाखाची पैज लावण्याची पोस्ट त्यांनी फेसबुक वर टाकली आहे. राज्यात राज्यसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे. असे असताना भाजप कडून तीन उमेदवार देण्यात आले आहेत. यामध्ये सर्वाधिक चुरशीची तिसरी जागा म्हणजे धनंजय महाडिक या जागेवर आपले नशीब आजमावत आहे. यावरून अरविंद देशमुख यांनी चक्क एक लाखाची पैज लावली आहे. यामुळे सोशल मीडियावर सर्वाधिक पोस्ट व्हायरल झाल्याने चर्चेचा विषय बनला आहे.
अरविंद देशमुख हे आरोग्य क्षेत्रात सह सामाजिक क्षेत्रात अधिक सक्रीय असतात यासोबत गिरीश महाजन यांचे खंदे समर्थक व सहाय्यक म्हणून आपली जबाबदारी पार पाडत आहे गिरीश महाजन हे जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री असताना अरविंद देशमुखांकडे महत्त्वपूर्ण जबाबदारी देण्यात आल्या होत्या, त्यांनी अतिशय कटाक्षाने पाडल्या आहे.
राज्यसभा निवडणूक भाजपने प्रतिष्ठेची बनवली आहे त्यामध्ये अनेक राजकीय डावपेच खेळले जात आहे यासोबतच भाजपकडून सत्ताधारी महाविकास आघाडीची कायदेशीर कोणी देखील केली जात असल्याने भाजपा कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांचा विजयाचा आत्मविश्वास अधिक वाढला आहे या सोबतच भाजप नेते गिरीश महाजन यांनी देखील माध्यमांसमोर दाव्याने तिन्ही उमेदवारांचा विजय होईल असे सांगितले आहे देवेंद्र फडणवीस देखील अचानक पणे सक्रिय झाले आहे याबाबतची महत्त्वपूर्ण जबाबदारी भाजपचे नेते गिरीश महाजन आशिष शेलार आणि प्रसाद लाड त्रिमूर्ती कडे देण्यात आली आहे.