भारतात पुन्हा एकदा कोरोनाच्या नवीन रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. गेल्या 24 तासांत देशात कोरोनाचे 8,329 नवीन रुग्ण आढळले आहेत. गुरुवारी आढळलेल्या प्रकरणांच्या तुलनेत हे प्रमाण सुमारे 10 टक्क्यांनी वाढले आहे. यासह, हा सलग चौथा दिवस आहे, जेव्हा देशात दररोज कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. 7 जून रोजी देशात दैनंदिन रुग्णांची संख्या पाच हजारांच्या पुढे होती, आता ही संख्या आठ हजारांच्या पुढे गेली आहे.
त्याचसोबत भारतात सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या 40,370 वर पोहोचली आहे. मात्र, गेल्या एका दिवसात केवळ 10 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला ही दिलासादायक बाब आहे. म्हणजेच संसर्गाचे प्रमाण वाढले असले तरी मृत्यूचे प्रमाण कमी आहे.
गुरुवारी भारतात कोरोनाचे 7584 रुग्ण आढळले, तर बुधवारी दररोज आढळणाऱ्या रुग्णांची संख्या 7240 होती. 7 जून रोजी देशात कोरोनाचे 5233 रुग्ण आढळले, तर 6 जून रोजी (मंगळवार) 3741 नवे बाधित आढळले. म्हणजेच गेल्या चार दिवसांत दैनंदिन प्रकरणांची संख्या जवळपास अडीचपट झाली आहे.
सरकार वारंवार लोकांना आव्हाहन करण्याचा प्रयत्न करत आहे ,कि नियमित मास्क वापरा ,गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा. नियमित हात स्वच्छ धुवा ,सानिताईझर वापरा. लसीकरण करा. लोकांनी स्वतःची काळजी घेतली तर येणाऱ्या कोरोनाच्या नवीन लाटेशी आपण सर्व मिळून सामना करू शकतो.