जळगाव राजमुद्रा दर्पण | अखिल भारतीय विद्यार्थी परिषद जळगाव जिल्ह्याचे अनुभूती शिबीर दिनांक ०७, ०८ व ०९ जून रोजी साकरे गावातील बालकृष्ण चत्रभुज भाटिया माध्यमिक विद्यालय साकरे ता. धरणगाव या ठिकाणी मोठया उत्साहात संपन्न झाले. या शिबिराचे उदघाटन साकरे गावाचे सरपंच शरद पाटील व तसेच वनसंपदा बहुउद्देशिय संस्थेचे संस्थाचालक चंद्रशेखर पाटील, अभाविप जिल्हा संयोजक इच्छेश काबरा, अभाविप राष्ट्रीय कार्यकारीणी सदस्य रितेश महाजन व शिबीर प्रमुख मनिष चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले.
या शिबिरात अनेक सत्रांचे नियोजन करण्यात आले होते. यामध्ये मैदानी खेळ, मशाल सत्र, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, योग व व्यायाम, अंताक्षरी, तसेच पथनाट्याच्या माध्यमातून अंधश्रद्धा निर्मूलन, मोबाइल चा दुरुपयोग, व व्यसन मुक्ती या वेगवेगळ्या विषयांवर गावामध्ये जनजागृती करण्यात आली. त्याचप्रमाणे वादविवाद स्पर्धा, पारंपरिक खेळ, सांस्कृतिक कार्यक्रम, संगीत संध्या, या कलात्मक कार्यक्रमाची योजना केली होती. गावामध्ये श्रमदानातून वृक्षलागवड आणि गाव स्वच्छता, असे विविध कार्यक्रम राबविण्यात आले होते. तसेच व्याख्यानाच्या माध्यमातून राष्ट्र उभारणीत युवकांचे योगदान हे प्रा.डॉ. मनीष जोशी यांनी तर करिअर मार्गदर्शन यावर असे वेगवेगळे सत्र या धरणगाव पोलीस निरीक्षक राहूल खताळ साहेब व उपनिरीक्षक अमोल गुंजाळ साहेब यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले, त्याचप्रमाणे शिबिरात विद्यार्थ्यांनच्या कला गुणांना वाव देण्यासाठी विविध कार्यक्रम व उपक्रम घेण्यात आले.
शिबिरा मध्ये एकून ११८ पेक्षा अधिक विद्यार्थी व विद्यार्थिनी पूर्णवेळ उपस्थित होते. यादरम्यान अनेक पूर्व कार्यकर्त्यांनी शिबिरात भेट दिली, शिबीराचा समारोप विभाग सह-संगठन मंत्री शुभम स्वामी यांनी केला.