(राजमुद्रा वृत्तसेवा) होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज औरंगाबाद येथे पद्युत्तर बालरोग विभागामध्ये रीडर आणि प्राध्यापक पदावर कार्यरत असलेले जळगाव जिल्ह्यातील सुप्रसिद्ध होमिओपॅथीक तज्ञ डॉ प्रशांत बडगुजर यांच्या होमिओपॅथिक औषधी विज्ञान क्षेत्रासाठीच्या कार्याची दखल घेत त्यांना केंद्रीय होमिओपॅथी परिषद नवी दिल्लीद्वारा संचलित महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिकच्या होमिओपॅथी पद्व्युत्तर बालरोग विभागात शिक्षणघेत असलेल्या डॉक्टरांना प्रमुख मार्गदर्शक म्हणजेच गाईड म्हणून नियुक्ती देण्यात आलेली आहे. त्यांच्या अनुभवाचा लाभ नवीन उद्योनमुख डॉक्टर्स एम. डी. अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना मिळणार आहे.
डॉ. प्रशांत बडगुजर हे मूळ जळगाव जिल्ह्यातील बोदवड येथील निवासी असून जळगाव , बोदवड औरंगाबाद, मलकापूर इत्यादी ठिकाणी आपली सेवा देत आहे. त्यांच्या या नियुक्तीसाठी फोस्टर डेव्हलपमेंट होमियोपेथिक मेडिकल कॉलेजच्या प्रिन्सिपल आणि सुप्रसिद्ध होमिओपॅथी तज्ञ डॉ.अनुपमा पाथ्रीकर मॅडम , तसेच औरंगाबाद येथील जेष्ठ होमिओपॅथी तज्ञ डॉ प्रमोद पालस्टे सर, डॉ. सूर्यकांत गीते सर यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या या नियुक्तीबद्दल फॉस्टर डेव्हलमेंट कॉलेजचे सर्व प्राध्यापक, कर्मचारी,त्यांचे नातेवाईक, मित्रपरिवार तसेच त्यांच्या महाराष्ट्र भर असलेल्या रुग्णांनी त्यांना शुभेच्छा कळविल्या आहेत.