काल म्हणजेच शनिवारी पहाटे 4 वाजता राज्यसभा निकाल जाहीर करण्यात आला , यात भाजपचे पियुष गोयल, अनिल बोंडे आणि धनंजय महाडिक हे तिन्ही उमेदवारांना घवघवीत विजयी मिळाला. महाविकास आघाडील ११ मतांचा झटका देत भाजपने तिसरी आणि सहावी धोक्याची जागा जिंकली. या पार्श्वभूमीवर राज्यसभा निवडणुकीच्या मत मोजणीला बराच कालावधी लागला होता.
क्रॉस व्होटिंग आणि नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल भाजप आणि सत्ताधारी आघाडीने निवडणूक आयोगाकडे (ईसी) केलेल्या तक्रारीमुळे मतमोजणीला सुमारे आठ तास उशीर झाली. क्रॉस व्होटिंगच्या आरोपानंतर भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षांनी काही मते अपात्र ठरवण्याची मागणी केली होती. महाराष्ट्रातील निवडणुकीचे निकाल समोर आल्यानंतर शिवसेनेचे संजय राऊत म्हणाले की, निवडणूक आयोगाने आमचे एक मत अवैध ठरवले आहे. दोन मतांवर आम्ही आक्षेप घेतला होता, मात्र कारवाई झाली नाही. आयोगाने त्यांची (भाजप) बाजू घेतली. त्याचवेळी काँग्रेसनेही यावर प्रतिक्रिया देत भाजपने पराभवाच्या भीतीने मतमोजणी थांबवण्याचा प्रयत्न केल्याचे म्हटले आहे.