जळगाव राजमुद्रा दर्पण | शहरात अखेर मान्सून दाखल कडाक्याच्या उन्हाळ्यानंतर जळगावकरांना दिलासा जळगाव शहरात पहिल्याच पावसाने जोरदार हजेरी लावत शहरातील रस्ते जलमय केले आहे. हवामान विभागाच्या वतीने सात तारखेला पावसाचे आगमन होणार असल्याची माहिती देण्यात आली होती यामुळे हवामानाच्या वातावरणाने हिट झालेला जळगावकरांना दिलासा मिळणार असे वाटत होते मात्र अनेक दिवसांपासून पप्रतीक्षेत असलेल्या पावसाला विलंब झाल्याने आज रोजी 12 तारखेला पावसाचे आगमन झाले यामुळे काही प्रमाणात जळगावकर नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
गेली चार महिने अतिशय कडाक्याच्या उन्हाळ्यानंतर शहर जलमय झाल्याने वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. पाऊस सुरू होताच नागरिकांची बाजारपेठेमध्ये चांगलीच तारांबळ उडालेली दिसून आली, यावेळी रविवार असून देखील भरगच्च भरलेल्या बाजारपेठा अवघ्या काही क्षणात रिकाम्या झालेल्या दिसून आल्या आहे. प्रत्येक जण पावसा पासून बचाव करण्यासाठी आडोसा शोधत होते तर बच्चेकंपनीने पहिल्या पावसात आनंद लुटताना दिसून आले.