जळगाव राजमुद्रा दर्पण | संत बाबा गुरदासराम साहेब यांच्या ९१ व्या जन्मोत्सवा निमित्त संत बाबा गुरदासराम चॅरिटेबलट्रस्टचे नेत्रज्योति हॉस्पिटल, सिंधी कॉलनी जळगाव या ठिकाणी दि. १५ जून २२ बुधवार रोजी सकाळी ९.३० ते संध्या ६.३० पर्यंत भव्य निःशुल्क आरोग्य तपासणी आणि मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
या शिबिरात नेत्ररोग तज्ञ डॉ. अल्विन राणे,डॉ. हीरा जोशी, आणि डॉ. शिरीष पाटील हे तपासणी करण्यासाठी निवडले असून त्यात मोतीबिंदू साठी आलेल्या रुग्णांवर इंडियन लेन्स सोबत मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात येनार आहे, तसेच त्या रुग्णांची आवश्यक आरोग्य तपासणी व रक्ततपासणी हे डॉ. तुषार बोरोले यांच्या तुषार पथोलॉजी लॅब च्या सहकार्याने करण्यात येणार आहे, त्याचसोबत डोळ्याच्या मधील पडद्याची रेटीना तपासणी डॉ. श्रुती चांडक हे करणार आहेत.
त्याचसोबत,सकाळी ९.३० ते ३ वाजे दरम्यान माधवराव गोळवलकर स्वयंसेवी रक्तपेढी यांच्या सह भव्य रक्तदान शिबिर देखील आयोजित करण्यात आले आहे.
या शिबिरात दंत तपासणी देखील होणार आहे यात डॉ. पिंकी नाथानी, डॉ. वर्षा रंगलानी व डॉ. सुप्रिया कुकरेजा हे मोफत दंत तपासणी करतील, तसेच डेंटल इम्प्लांट मध्ये सवलत देण्यात येणार आहे .जनरल आरोग्य तपासणी डॉ. मोहनलाल सध्रिया हे करनार आहेत.
तरी सर्व समाजातील नागरिकांना, रक्तदात्याना व रुग्णांना ट्रस्ट चे अध्यक्ष डॉ. गुरुमुख जगवानी, उपाध्यक्ष श्री. दिलीप मंघवणी, सेक्रेटरी डॉ. मूलचंद उदासी व सर्व ट्रस्टीगण मार्फत जास्तीत जास्त संख्येने रक्तदान करून गरजू रुग्णांची मदत करण्यास सहकार्य करावे तसेच मोफत तपासणी आणि शस्त्रक्रिया शिबिराचा लाभ घ्यावा ही विनंती व आवाहन करण्यात आले आहे