जळगाव राजमुद्रा दर्पण – शिवसेनेचा एकही आमदार फुटलेला नाही अपक्ष आमदारांनी मतभेद दिली हे माध्यमां मध्ये समजले एक खासदार निवडून आला म्हणजे गावांमधील पैलवान निवडून आला असे चित्र निर्माण केले जात आहे. राज्यसभेचा खासदार निवडून नाही आला म्हणून मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे असे राणे यांनी म्हटले, मग राजस्थान मध्ये भाजपचा एकच खासदार निवडून आला मग तिथल्या निवडणूक प्रभारी यांनीराजीनामा दिला पाहिजे का असा प्रतिसवाल गुलाबराव पाटील यांनी नारायण राणे यांनी केलेल्या टीकेवर उपस्थित केला आहे.
जिल्हा वैद्यकीय महाविद्यालयात आयोजित इमारत बांधकाम भूमिपूजन कार्यक्रमात गुलाबराव पाटील यांनी विरोधकांचा समाचार घेतला आहे या वेळी जिल्हा वैद्यकीय महाविद्यालयात नव्या इमारतीचे उद्घाटन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी महापौर जयश्री महाजन,आमदार संजय सावकारे, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता रामानंद यासह वैद्यकीय महाविद्यालयाचे कर्मचारी उपस्थित होते