जळगाव राजमुद्रा दर्पण । माझी उपमहापौर व नगरसेवक मा.श्री आश्विन सोनवणे यांनी मनपा ला घनकचरा प्रकल्प लवकर मार्गी लावण्याची मागणी एका प्रत्राद्वारे केली .
यात त्यांनी लिहिले आहे की, ‘गेल्या बऱ्याच वर्षांपासून घनकचरा प्रकल्पाचा विषय रखडला आहे , प्रकल्पाची निविदा होऊनही मक्तेदार काम करण्यास तयार नाही त्यामुळे परिसरातील नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. या प्रकल्पासाठी जवळ जवळ 48 कोटीचा निधी मंजूर झालाय ,तरीही हा प्रकल्प आजपर्यंत पूर्ण झाला नाहीये. यामुळे बरेच रोग पसरता आहे, लोकांना याचा त्रास होतोय , जळगाव शहरा सह धरणगाव तालुका व पूर्ण जळगाव तालुका बाधित होत आहे, सत्ताधारी व प्रशासन जनतेशी खेळ खेळत आहे,हा खेळ त्यांनी बंद करावा व हा प्रकल्प बीटीओ तत्वावर द्यावा आणि यामुळे मनपा च्या निधीचा बचत च होणार आहे, त्या निधीतून आपण उरलेली कामे करू शकतो .याआधी गोलानी मार्केट देखील मनपा ने बीटीओ तत्वावर दिले होते,त्यानुसार मनपाने घनकचरा प्रकल्प देखील बीटीओ तत्वावर द्यावा व मनपाचा निधी वाचवा आणि लोकांच्या आयुष्याशी होणार खेळ थांबवा’ असे या पात्रात लिहिले आहे .