जळगाव राजमुद्रा दर्पण । जळगाव जिल्हा रुग्णालयाने पाठविलेल्या एका कोरोना अहवालात एका दिवसात सहा नवीन कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे सध्या 16 कोरोना लागण झालेले रुग्ण कोवीड हॉस्पिटल मध्ये उपचार घेत आहेत.
अख्या राज्यात दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांचा आकडा वाढतच आहे. त्यामुळे प्रशासनाकडून काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. जिल्ह्यात देखील कोरोना बाधितांची संख्या आढळून येत आहेत. मागील गेल्या दोन ते तीन महिन्यात कोरोना जवळपास कव्हर झाला होता,पण आता कोरोनाच्या नविन येणाऱ्या लाटेत रूग्णांच्या संख्येत वाढ झाल्याचे दिसून येत आहे. जळगाव जिल्ह्यात सध्या 16 कोरोना बाधित रुग्णांची संख्या आहे. त्यांच्यावर उपचार सुरु आहे.
संपूर्ण जिल्ह्यात आतापर्यंत 1 लाख 51 हजार बाधित रुग्ण :- जिल्ह्यात काल म्हणजेच मंगळवारी सहा बाधित आढळून आले आहेत. यात चोपडा तालिक्यातून 1 , भुसावळ तालुक्यातून 3 आणि यावल मधून 2 असे एकूण 6 कोराना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. जळगाव जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 1 लाख 51 हजार 575 कोरोना बाधित रुग्णांची नोंदणी झाली आहे. त्यापैकी 1 लाख 48 हजार 968 रूग्ण उपचार घेऊन घरी परतले असल्याची माहिती मिळाली आहे.
त्यामुळे जळगावकारांनो काळजी घ्या ..