जळगाव राजमुद्रा दर्पन ।महाराष्ट्र बोर्ड 10वीचा निकाल उद्या दुपारी 1 वाजता mahresult.nic.in आणि sscresult.mkcl.org या वेबसाईट वर प्रसिद्ध होईल. याची शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ट्विट करून परीक्षेच्या निकालाची तारीख आणि वेळेची माहिती दिली.
महाराष्ट्र बोर्ड (MSBSHSE) परीक्षेचा निकाल पत्रकार परिषदेत जाहीर करेल. कोरोनामुळे 2021 मध्ये परीक्षा रद्द झाल्यानंतर यावर्षी 15 मार्च ते 4 एप्रिल 2022 या कालावधीत महाराष्ट्र बोर्ड एसएससी परीक्षा सुरळीत पार पडली. एकूण 16,38,964 विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती, ज्यामध्ये 8,89,506 मुले आणि 7,49,458 मुली होत्या. , एकट्या मुंबई विभागात एकूण 3,738,40 विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती.
यापूर्वी महाराष्ट्राचा 12वीचा निकाल 2022 जाहीर झाला होता, बारावीत 94.22 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
पुणे राज्य मंडळ कार्यालयाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, “निकाल ऑनलाइन जाहीर केले जातील आणि मार्कशीटच्या हार्डकॉपी वेगवेगळ्या शाळांद्वारे वितरीत केल्या जातील. राज्याच्या काही भागात प्रवासी निर्बंध असतानाही शिक्षकांनी यावर्षी वेळेवर मूल्यांकन प्रक्रिया पूर्ण केली आहे.”
महाराष्ट्र बोर्ड 10वीचा निकाल कसा तपासायचा ? :-
1) – सर्वप्रथम mahresult.nic.in या अधिकृत वेबसाइटवर जा.
2) – महाराष्ट्र एसएससी निकाल 2022′ (निकाल जाहीर झाल्यानंतर) लिंकवर क्लिक करा.
3) – स्क्रीनवर एक नवीन पृष्ठ दिसेल.
4) – विचारलेले क्रेडेन्शियल एंटर करा आणि सबमिट पर्यायावर क्लिक करा.
5) – तुमचा महाराष्ट्र 10वीचा निकाल 2022 स्क्रीनवर दिसेल.
6) – निकाल डाउनलोड करा आणि भविष्यातील संदर्भासाठी त्याची प्रिंटआउट घ्या.
यावर्षी महाराष्ट्र बोर्डाचा निकाल सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन (CBSE) आणि कौन्सिल फॉर इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन्स (CISCE) च्या पाहिले जाहीर होत आहे.
गेल्या वर्षी दहावीचा निकाल कसा लागला होता :-
गेल्या वर्षी MSBSHSE 10वी (महाराष्ट्र बोर्ड SSC परीक्षा) आणि MSBSHSE HSC परीक्षा (महाराष्ट्र बोर्ड 12वी परीक्षा) कोरोनामुळे रद्द करण्यात आल्या होत्या. बोर्डाने ठरवलेल्या मूल्यमापन धोरणाच्या आधारे 10वी आणि 12वीच्या परीक्षेचे निकाल जाहीर करण्यात आले. परीक्षा न झाल्यामुळे बोर्डाने गेल्या वर्षी गुणवत्ता यादी आणि टॉपर्सची यादीही जाहीर केली नाही. गेल्या वर्षी महाराष्ट्र बोर्डाचा दहावीचा निकाल 99.95 टक्के लागला होता. कोकण विभागाचा निकाल 100 टक्के तर नागपूरचा 99.84 टक्के लागला होता, 957 विद्यार्थ्यांना 100% गुण मिळाले होते.