जळगाव राजमुद्रा दर्पण । आज पूर्णा नदीच्या पाण्याची पातळी वाढण्यास सुरुवात झाली आहे,त्यामुळे हातनूर धरणातून काही तासांमध्ये तापी नदीत पाणी सोडण्यात येऊ शकते या संदर्भात जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी चे उपविभागीय अधिकारी भुसावळ यांनी जनतेला सावध राहण्याचे आदेश एका पत्राद्वारे दिले दिले आहेत, यात असं लिहिला आहे की , “आज दिनांक 17/06/2022 रोजी पुर्णा नदीची पाणी पातळी वाढण्यास सुरूवात झालेली असून हतनूर धरणातून पुढील 4.00 ते 8.00 तासांमध्ये तापी नदी पात्रात हतनूर धरणांमधून पाणी प्रवाह सोडण्यात येऊ शकतो तरी पुढील हतनूर धरणाचे खालील गावांमध्ये सूचना देऊन तापी नदी पात्रांमध्ये कुणीही गुरेढोरे सोडू नये अथवा कोणी तापीनदी पात्रांमध्ये जाऊ नये याकरिता प्रत्येक गावात दवंडी द्वारे सूचना देणे आवश्यक आहे हे आपले माहितीसाठी व कार्यवाहीसाठी सविनय सादर करण्यात येत आहे”
तरी गावकऱ्यांनी सावधगिरी बाळगावी ..