जळगाव राजमुद्रा दर्पण | कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ परिसरात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींच्या आरोग्याच्या सुरक्षिततेसाठी सॅनिटरी पॅड मशीन सुरू करावी व विद्यार्थिनींच्या आरोग्य च्या प्रश्न मार्गी लावावा या मागणीला घेऊन अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने प्रभारी कुलसचिव डॉ. किशोर पवार यांना निवेदन देण्यात आले. विद्यापीठ परिसरात गेल्या कित्येक दिवसांपासून सॅनिटरी पॅड मशीन बंद असल्यामुळे विद्यार्थिनींना विविध प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. तरी या विषयाची विद्यापीठ प्रशासनाने गांभीर्याता लक्षात घेऊन लवकरात लवकर सॅनिटरी पॅड मशीन योग्य त्या ठिकाणी बसवून विद्यार्थिनींच्या समस्यांचे निवारण करावे अन्यथा विद्यार्थिनींच्या रोषाला सामोरे जावे लागेल. यावेळी अभाविप कार्यकर्ते उपस्थित होते.