जळगाव राजमुद्रा दर्पण | जळगाव जिल्ह्यात पोलिसांकडून मोठ्या प्रमाणात वाहन धारकांकडून पैशाची वसुली सुरू असल्याचा खळबळजनक आरोप भाजप आमदार संजय सावकारे यांनी केला आहे. वाहतूक पोलिसांना मोठ्या प्रमाणात ठराविक जागेवर थांबून टार्गेट देऊन वसुली केली जात असल्याचा आरोप देखील त्यांनी केला आहे. जळगाव जिल्हा नियोजन समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आली होती. यामध्ये पोलिसांकडून वाहन धारक नागरिकाना चुकीच्या पद्धतीने नियमाचे ढोंग करून त्रास दिला जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
जळगाव जिल्ह्यात थेट पोलिसांच्या वसुली वरून आरोप जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत आमदारांनी केल्याने जिल्हा भरात चर्चेचा विषय ठरला आहे. भाजपचे आमदार संजय सावकारे व शिवसेनेचे आमदार चिमणराव पाटील यांनी वसुलीच्या मुद्दयावर थेट पालकमंत्र्यांना घेरले आहे.
भाजप आमदार संजय सावकारें यांनी थेट पोलिसांकडून वसूली बेकायदा वसुलीचा आरोप केल्या नंतर सत्ताधारी शिवसेना पक्षाचे आमदार चिमणराव पाटील यांनी देखील पोलिसांकडून नागरिकांना वसुली संदर्भात होत असलेल्या त्रास यासंदर्भात तात्काळ चौकशी करावी अशी मागणी करीत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना जाब विचारीत राज्यातील सत्ताधारी शिवसेनेला घरचा आहेर दिला आहे.
पालकमंत्री गुलाबराव पाटील वाहनधारका नागरिकांकडून चुकीच्या पद्धतीने जर पोलीस वसुली करीत असतील तर संबंधितांची चौकशी करून कठोर कार्यवाहीचा ईशारा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनीं दिला आहे.