अखिल भारतीय विद्यार्थी परिषद ,जळगांव महानगर मेडीव्हिजन आयामांतर्गत मोफत आरोग्य तपासणी शिबिर व मार्गदर्शन आणि त्याच प्रमाणे महिला व युवतींसाठी ऋतूमती अभियानाचे आयोजन कांचन नगर येथील बिंदुबाई सोनवणे मंगल सभागृह येथे करण्यात आले होते.कार्यक्रमाचे उद्घाटन इंडियन मेडिकल असोसिएशनचे जळगांव जिल्हाध्यक्ष सुनील भंगाळे,धर्मसातीचे संपादक प्रसाद जोशी,अखिल भारतीय विद्यार्थी परिषद जळगांव महानगर मंत्री व राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य रितेश महाजन,शिबिरातील तज्ञ डॉ. अमोल पाटील,अभाविप पूर्व कार्यकर्ते संजय नारखेडे ,अभाविप जळगाव मेडिव्हिजन संयोजक व देवगिरी प्रांत मेडिव्हिजन सहसंयोजक शिवराज मुसळे व आरोग्य तपासणी शिबिर प्रमुख अविरत पांडव यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अभाविप जळगाव महानगर मंत्री तथा राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य रितेश महाजन यांनी केले.सुनील भंगाळे यांनी उद्घाटनपर भाषण केले.प्रसाद जोशी यांनी अभविपच्या कार्याचा गौरव केला.शिवराज मुसळे यांनी आरोग्य तपासणी आणि ऋतुमती अभियान या संदर्भात माहिती दिली.या प्रसंगी नागरिकांचा उस्फूर्त प्रतिसाद लाभला.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भुमिका कानडे यांनी केले. अविरत पांडव यांनी आभार मानले.आरोग्य तपासणी शिबिरांतर्गत नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी करून त्यांच्या विविध समस्यांचे निराकरण करीत मोफत गोळ्या, औषधी,मास्क चे वितरण करण्यात आले.त्याचप्रमाणे ऋतूमती अभियानांतर्गत महिलांना मासिक पाळी दरम्यान येणाऱ्या समस्यांचे निवारण व त्यासंदर्भात माहिती देऊन सॅनिटरी नॅपकिन आणि मास्क चे मोफत वाटप करण्यात आले.
त्याचप्रमाणे अभाविप कार्यकर्ते आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे व डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाचे विद्यार्थी यांनी परिसरात घरोघरी जाऊन मासिक पाळी संदर्भात जनजागृती करीत सॅनिटरी नॅपकीन चे वाटप केले.या अभियानात महिला व युवतींनी निःसंकोचपणे आपल्या समस्यांचे निराकरण करून घेत मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला. तरी आगामी काळात ज्या विद्यार्थ्यांना या मध्ये सहभागी व्हायचे आहे त्यांनी अभाविपशी संपर्क साधावा.