मुंबई राजमुद्रा दर्पण । विधान परिषद निवडणुकीला फक्त काही तास बाकी आहेत या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे उमेदवार एकनाथराव खडसे हे सक्रिय होऊन काम करत आहेत. आज एकनाथराव खडसे यांनी मतदानासाठी बहुजन विकास आघाडीचे हितेंद्र ठाकूर यांची भेट घेतली व चर्चा केली. बंद दरवाजा आड झालेल्या या चर्चेचा सविस्तर तपशील उघड झाला नाहीये. पण खडसे यांचा चेहरा आनंदी दिसत होता. खडसे यांनी आज भाजपच्या काही आमदारांना फोन केल्याची बातमी समोर आली आहे. ह्यावेळी तुम्हाला मला मदत करावी च लागेल, असं खडसे यांनी या आमदारांना फोनवर बोलल्याचं सांगितलं जातय. खडसे जेव्हा भाजपमध्ये होते त्यावेळी त्यांनी अनेकांना प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रित्या मदत केली होती. आता त्यामुळे त्यांनी या आमदारांकडे मते मागितली आहेत. विशेष बाब म्हणजे यावेळी गुप्त मतदान आहेत. त्यामुळे हे काही आमदार खडसे यांच्या विनंतीला मान देनार का याच्याकडे सर्वांचं लक्ष लागले आहेत .भाजपा ने ताज प्रेसिडेंट या हॉटेल मध्ये त्यांच्या आमदारांना ठेवलं आहे. आज एकनाथराव खडसे यांनी भाजपच्या काही आमदारांना फोन केला व ह्या वेळी मला तुम्हाला मतदान करावंच लागेल. असे खडसे आमदारांना बोलले, आज खडसेंचा आमदारांना फोन आल्याची जोरदार चर्चा ताज प्रेसिडेंट या हॉटेल मधील भाजप आमदारांमध्ये रंगली आहे. तर खडसेंना हे आमदार मतदान करणार का ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे
भाजपा मध्ये अनेक समर्थक :-
भाजपमध्ये दोन खडसे समर्थक आमदारांची मते मिळणार असे सांगितलं बोलले जात आहे. या संदर्भात विचारलं असता भाजपमध्ये आपले दोन पेक्षा अनेक समर्थक आहे त्यातले काही अजूनही माझ्या संपर्कात आहेत. पण स्वतःच्या पक्षाला सोडून ते मला मतदान करतील असं काही दिसत नाहीये. मी पडलो पाहिजे असं होणार नाही तर भाजप आमचा मुख्य विरोधक आहे त्यासाठी आम्ही भाजपला पाडण्यासाठी तयार आहोत, असे एकनाथ खडसे यांनी सांगितलं.
ठाकूर योग्य तो निर्णय घेतील का :-
आज एकनाथ खडसे यांनी हितेंद्र ठाकूर यांची भेट घेतली विरार मधील विवा महाविद्यालया या ठिकाणी दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास बराच वेळ चर्चा रंगली त्याच्यानंतर खडसे यांनी मीडियाशी संवाद साधला.ते म्हणाले की, ‘ मी उमेदवार आहे. बविआकडे तीन मते आहे, त्यामुळे मी त्यांच्याकडील हे मते मागायला आलो आहे. हितेंद्र ठाकूर योग्य तो निर्णय घेतील. मी शब्द घेण्यासाठी आलो नाहीये. तर मत मागण्यासाठी आलो आहे. उमेदवार म्हणून मत मागणं माझं काम आहे आणि ते योग्य तो निर्णय घेतील, असं त्यांनी सांगितले
आमचा संबंध जुना आहे :-
आज झालेल्या या भेटीत आमची कौटुंबिक चर्चाही झाली.आमचा 32 वर्षांपासूनचा संबंध आहे. राजकारना पलीकडे आमची ओळख आहे. असं खडसे म्हणाले. तर ठाकूर यांनी मीडियाशी संवाद साधण्यास नकार दिला.