यावेळी विधानपरिषदेच्या निवडणुकीत ही लढाई उपमुख्यमंत्री अजितदादा पवार विरुद्ध देवेंद्र फडणवीस असा दिसत आहे. अजित पवार यांनी एक अर्थी फडणवीसांनी दिलेलं आव्हान स्वीकारत, ज्याच्याकडे कोशल्य आहे, तो निवडणूक जिंकेल, असे सांगत फडणवीसांनाच थेट आव्हान दिल्याचे मानण्यात येते आहे , राष्ट्रवादी ,काँग्रेस् व भाजपा या तिघी पक्षांना या निवडणुकीत मतांची जास्त गरज आहे
राज्यसभा निवडणुकी सारखी ही निवडणूकही महाविकास आघाडी सरकार व भाजपा यांनी प्रसिद्ध केली आहे. विधानपरिषद निवडणुकीला फक्त काही तास उरले आहेत, राजयसभा व विधानसभा या दोन्ही निवडणुकीतील जो प्रमुख फरक आहे तो असा की राज्यसभा निवडणुकीत लढाई ही शिवसेना विरुद्ध भाजपा अशी होती , त्यात भाजपाने राज्यसभेची तिसरी जागा मिळवली व दमदार विजय मिळवला. राज्यात देवेंद्र फडणवीसांचे खूप कौतुक करण्यात आले. राज्यामधील राजकारणाचे चाणक्य अशी ओळख त्यांना दिली व शरद पवारांनी देखील हा चमत्कार मान्य केल्याचे दिसून आले त्यांनी देवेंद्र फडणवीसांचं कौतुकही केलं होतं. मात्र या विधान परिषदेच्या निवडणुकीत ही लढाई उपमुख्यमंत्री अजित पवार विरुद्ध देवेंद्र फडणवीस अशी दिसत आहे. अजित पवारांनी इकडे फडणवीसांचं आव्हान स्वीकारत, ज्याच्याकडे कौशल्य आहे, तो निवडूक जिंकेल, असे सांगत थेट फडणवीसांनाच आव्हान दिल्याचे मानण्यात येते आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि भाजपा या तिन्ही पक्षांना या निवडणुकीत अधिक मतांची गरज आहे.
विधान परिषदेचं गणित :-
10 जागांसाठी ११ उमेदवार मैदानात आहे. प्रत्येक उमेदवाराला जिंकण्यासाठी २६ मतांची आवश्यक आहे. याआधी तो २७ होता. पण आता तो २६ झाला आहे. एकूण २८४ आमदार या निवडणुकीत मतदान करणार आहेत. शिवसेनेकडे ५५ मते आहेत. त्यांचे दोन उमेदवार सचिन अहिर आणि आमषा पाडवी या दोघांना ५२ मतांची गरज आहे, ती मते त्यांना सहज शक्य आहे त्यामुळे शिवेसेनेच्या दोन्ही उमेदवारांचा विजय निश्चित आहे असे मानण्यात येत आहे . या संख्याबळा सोबत शिवसेनेकडे बच्चू कडू यांच्या कडचे दोन आमदार, आशिष जैस्वाल, शंकरराव गडाख, चंद्रकांत पाटील व गीता जैन अशी काही मते आहेत. इतर मते पकडल्यास शिवसेनेचे संख्याबळ ६२ इतके आहे. आता या व्यतीरिक्त मतांवर काँग्रेसचा डोळा आहे. बच्चू कडू, शंकरराव गडाख हे शिवसेनेकडून मंत्रीपदावर असल्याने त्यांच्या मतांचा निर्णय शिवसेनेजवळ आहे. त्यामुळे शिवसेनेला पाठिंबा देणाऱ्या ह्या सहा अपक्ष आमदारांना फोडण्याचा काँग्रेसचा प्रयत्न सुरु आहे. अशा परीस्थितीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून आघाडी मधील शिवसेना टार्गेट होताना दिसत आहे. त्यामुळे शिवसेनेचे आमदार आणि सहयोगी आमदारांची मते किती स्थिर राहतील या संबंधातील शंका उपस्थित करण्यात येते आहे.