पश्चिम बंगाल निवडणुकांना घेऊन छगन भुजबळ आणि चंद्रकांत पाटील यांच्यात शाब्दिक चकमकी झाल्या होत्या. पाटील यांनी भुजबळ यांच्यावर चक्क धमकीचा सूर लावला होता. याला उत्तर म्हणून ‘चंद्रकांत पाटील यांनी छगन भुजबळ यांची तात्काळ माफी मागावी. भुजबळ हे जेष्ठ नेते आहेत. त्यांचा हा असा अपमान सहन केला जाणार नाही’ असे वक्तव्य ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले.
पश्चिम बंगालच्या निवडणूक संदर्भात छगन भुजबळ यांनी टिपणी केली होती. ममता बॅनर्जींना झाशीच्या राणीची उपमाही दिली होती. यावर चंद्रकांत पाटलांनी ‘तुम्ही जामिनावर आहात, जोरात बोलू नका, महागात पडेल’ असे विधान केल्याने वाद वाढला होता. छगन भुजबळ यांनीही यावर प्रतिउत्तर दिल्याने चांगलीच तू तू मै मै झाली होती. यावर हसन मुश्रीफ यांनी आज चंद्रकांत पाटलांवर पलटवार करत ‘प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांना एवढा राग येण्याची आवश्यकता नव्हती, कोर्ट त्यांच्या खिशात नाही. त्यांनी भुजबळांची तात्काळ माफी मागावी अशी मागणी केली.