जळगाव राजमुद्रा दर्पण :- राज्यात विधानपरिषदेची रणधुमाळी सुरू आहे. यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. मतांची जुळवाजुळव करताना राजकीय नेते कामाला लागले आहेत यामध्ये सर्वाधिक चर्चा ही राष्ट्रवादीचे नेते एकनाथराव खडसे यांचा उमेदवारीची होत आहे. खरंच यासाठी खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खडसे यांच्या विजयासाठी निवडणूक प्रतिष्ठेची बनवली आहे. कारण पूर्वाश्रमीचे भाजप नेते असलेले खडसे यांचा प्रवेश विधान परिषदेच्या सभागृहात झाला तर अनेकांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. भाजपमध्ये असताना झालेला मानसिक छळ यामुळे खडसे देखील “अरे ला कारे” अशी चर्चा आता राज्यभरात होऊ लागली आहे.
विधान परिषदेचा उमेदवारी अर्ज भरत असताना खडसे यांनी भाजपवर टीका करताना सर्वाधिक रोष राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर व्यक्त केला आहे. गेल्या काळात देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजनांमुळे माझे राजकीय अस्तित्व धोक्यात आले “या दोघांनीच माझा छळ केला” असा आरोप खडसे करीत राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून दिली होती. यामुळे खडसे यांना विधान परिषदेत कोणत्याही परिस्थितीत प्रवेश करू द्यायचा नाही त्यांचा पराभव करायचा असा हट्ट देखील विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या टीमने केला आहे. त्यामुळे खडसे यांच्या राजकीय भवितव्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असणार आहे.
जळगावातील दोन आमदार खडसे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून मतदान करणार असल्याचे सांगितले जात आहे. यामध्ये तू जरी शंका असली तरी नेमकं मतदान कोणाला केलं गेलं खडसे यांच्या विधानपरिषदेच्या निकालावर लक्षात येणार आहे.
विधान परिषदेचा 26 मतांचा कोटा ठेवण्यात आला आहे. यामध्ये खडसे यांना फक्त एका मताची गरज आहे. मात्र भाजपकडून कोणताही दगाफटका नको म्हणून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विशेष काळजी घेतली असल्याचे सांगितले जात आहे. विधान परिषदेच्या मतदानाला सकाळी नऊ वाजेपासून सुरुवात झाली आहे. एकामागून एक विविध पक्षाचे राजकीय नेते आमदार मतदानासाठी सभागृहात दाखल होत आहेत. त्यांना कोणत्याही परिस्थितीत विधानपरिषदेत विजय मिळावा म्हणून राष्ट्रवादीने मतांचे तंतोतंत नियोजन केले असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले आहे. यासाठी काही अपक्षांचा देखील पाठिंबा मिळवण्यासाठी संपर्क झाला असल्याचे सांगितले गेले आहे. काही अपक्षांनी देखील खडसे यांच्या नावाला सहमती दर्शवली आहे.
कालच एकनाथराव खडसे यांनी बविआ चे नेते जितेंद्र ठाकूर यांची भेट घेऊन मतदान करण्याचे आवाहन केले आहे. असे असताना अनेक भाजपचे जुने पदाधिकारी व आमदारांची देखील संपर्क करण्याचा प्रयत्न केला आहे. गेली चाळीस वर्ष खडसे यांची कारकीर्द भाजपमध्ये कधी आहे. अनेकांना तिकीट मिळवून देण्यासाठी तसेच मंत्री पदापर्यंत संधी देण्याचं काम खडसे यांनी केले आहे. याची जाण ठेवून भाजपमधील एक गट खडसे यांच्या पाठीशी राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.गेल्या काही वर्षांपासून सत्ते शिवाय कामे होते नसल्याने भाजपमधील काहीं आमदारांमध्ये नाराजीचा सूर आहे. तर हाच नाराजीचा फायदा राष्ट्रवादी उचलू शकते यामुळे खडसे यांना विजयी करण्यासाठी राष्ट्रवादी देखील तोडो-फोडो चे राजकारण स्वीकारणार हे निश्चित आहे.