जळगाव, ता. २० : वर्गाच्या प्रवेशद्वारावर फुलांसह आंब्यांच्या पानांचे बांधलेले तोरण.. विद्यार्थ्यांचे स्वागत.. असे वातावरण शहरातील गणपती नगरातील जी. एच. रायसोनी इस्टीट्युट संचलित रायसोनी वंडर किड्समधील चिमुकल्यांचा प्रवेशोत्सवावेळी पाहायला मिळाले. उन्हाळ्याची सुट्टी संपल्यानंतर जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूलची वंडर किड्स हि प्राथमिक प्ले ग्रुप ते सिनिअर केजी स्कूल सोमवार ता. २० जूनपासून सुरू झाली. यावेळी नव्याने दाखल झालेल्या चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर थोडीशी भीती होती पण शिक्षकांकडून झालेले अनोखे स्वागत पाहून चिमुकले भारावले. तसेच शाळेच्या विश्वात पहिल्यांदाच पाऊल टाकणाऱ्या चिमुकल्यांनी नव्याकोऱ्या गणवेशाची, नवीन वर्गाची, नवीन दप्तर-पाठ्यपुस्तकांची नवलाई अनुभवली. रायसोनी वंडर स्कूलच्या संचालिका सौ. राजुल रायसोनी यांनी वंडर किड्सच्या चिमुकल्यांचे अनोखे स्वागत केले. सौ. राजुल रायसोनी यांनी विद्यार्थ्यांचे स्वागत करत चॉकलेट दिले तसेच त्यांच्या हाताला धरून त्यांना स्कूलमध्ये आणले. यावेळी विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी मुख्याध्यापिका तेजल ओझा, तस्नीम टकंरवाला, नेहा चिंचोले, मयुरी वालेचा, आरती पाटील, निधी खडके, रिंकू लुल्ला, सोनिया शर्मा, नेहा शिंपी, दिपाली कुलकर्णी आदींसह पालक, स्कूल कमिटी सदस्य उपस्थित होते.
चिमुकल्यांच्या सर्वांगीण विकासावर भर देणार “रायसोनी वंडर किड्स”
मुलांना दर्जेदार शिक्षण उपलब्ध करुन देणे, त्यांचा सर्वांगीण विकास करणे, त्यासाठी एटरॅक्टीव्ह स्मार्ट क्लासरूम, किड्स लाब्रेरेरी, आर्ट स्टुडीओ, पपेट थेटर, आउटडोर प्ले एरिया, मोंटेसरी टूल बेस्ड लर्निग, लाईफ स्कील अॅन्ड, कल्चरल ट्रेनिग, आर्ट इंटेग्रेटेड लर्निग, स्पोर्ट अॅन्ड फिटनेस ट्रेनीग तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान, सुयोग्य अभ्यासक्रम, गुणवत्ता असलेले निष्ठावंत शिक्षक, आदर्श पायाभुत सुविधा इत्यादी सर्व सुविधा रायसोनी इस्टीट्युटने शहरातील गणपती नगर येथील जी. एच. रायसोनी वंडर किड्समध्ये प्ले ग्रुप ते सिनिअर केजी या वर्गासाठी निर्माण करुन दिल्या आहेत. या स्कूलमध्ये शिक्षकांना ट्रेनिंग पोग्राम स्वतंत्र दिले आहेत तसेच स्कूलमधील प्रत्येक वर्गाचे सुक्ष्म नियोजन केले आहे. तसेच जी. एच. रायसोनी इस्टीट्युटचे केजी टू पीजी या धोरणात रायसोनी पब्लिक स्कूल व रायसोनी वंडर किड्सचे शिक्षण सदैव गुणवत्तापूर्ण असेल असे मत रायसोनी वंडर किड्सच्या मुख्याध्यापिका तेजल ओझा यांनी स्कूलच्या पहिल्या दिवशी व्यक्त केले.