(जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा) राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वक्ता प्रशिक्षण शिबीर या विभागाचे प्रदेश अध्यक्ष प्रदीप सोळंखे यांच्या मार्गदर्शनाखाली बळीराम पेठेतील रहिवासी तसेच सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत असलेले रमेश भोळे यांची महानगरअध्यक्ष अभिषेक पाटील यांच्या हस्ते ‘वक्ता प्रशिक्षणच्या जळगाव महानगरअध्यक्ष’ पदी नियुक्ती करण्यात आली.
रमेश भोळे हे जळगावातील जेष्ठ रंगकर्मी आहेत. भोळे यांनी गेल्या कित्तेक वर्षांपासून जळगाव नाट्य संस्कृती टिकवण्यासाठी मोठे प्रयत्न केले असून सध्या राष्ट्रवादीच्या सांस्कृतिक विभागाच्या प्रमुख सल्लागार पदावर रुजू आहेत. भोळे यांच्या अनुभवाचा आणि सांस्कृतिक कामातील हातखंड बघता वक्ता प्रशिक्षण जळगाव महानगर अध्यक्ष पदी त्यांची निवड करण्यात आल्याचे सांस्कृतिक विभाग प्रमुख गौरव लवंगळे यांनी राजमुद्राशी बोलतांना सांगितले.
या वेळी उत्तर महाराष्ट्रच्या उपाध्यक्ष कल्पना पाटील, युवक महानगर अध्यक्ष स्वप्नील नेमाडे , सचिव अँड. कुणाल पवार, रमेश पाटील, अमोल कोल्हे, अशोक पाटील, जयश्री पाटील, दिलीप सिख्वाल, आशा अंबुरे, अर्चना कदम, गौरव लावंगे, दिव्या पाटील, लता पाटील, शकुंतला धर्माधिकारी, उज्वल शिंदे, हर्षवर्धन खैरनार तसेच पक्षाचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते .