अख्या महाराष्ट्र चे लक्ष वेधलेल्या विधानपरिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी विधानपरिषद निवडणुकीत दमदार विजय संपादन केला आहे. त्यामुळे गेल्या पावणे तीन वर्षानंतर पुन्हा एकदा एकनाथराव खडसेंची विधीमंडळात एंट्री होणार आहे.
विधानसभेच्या सदस्यांतुन निवडून जाणाऱ्या जागांसाठी 20 जून रोजी म्हणजेच आज निवडणूक होणार होते ,यासाठी कुणाला उमेदवारी मिळणार याबाबत संपूर्ण राज्यात उत्सुकता निर्माण झाली होती. या पार्श्वभूमीवर 10 जून रोजी झालेल्या राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेला पराभव पत्करावा लागला होता . बहुतेक वेळा या निवडणुका बिनविरोध होत असत, पण भाजपने आपला पाचवा उमेदवार मैदानात उतारल्याने उत्सुकता वाढली होती.