मुंबई राजमुद्रा दर्पण । महाराष्ट्रातील राजकीय पेचप्रसंगाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांची विधिमंडळ पक्षनेतेपदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. त्यांच्या जागी शिवडीचे आमदार अजय चौधरी यांची शिवसेना विधिमंडळ पक्षनेतेपदी नियुक्ती करण्यात आल्याचे सूत्रांकडून माहिती मिळाली आहे. खरं तर, ठाकरे सरकारमधील मंत्री असलेले शिंदे हे इतर 21 पक्षाच्या आमदारांसह गुजरातमध्ये पोहोचले आहेत, जिथे ते सुरतमधील मेरिडियन हॉटेलमध्ये पक्षाच्या आमदारांसोबत राहत आहेत. पक्षाचे नेते त्यांच्याशी संपर्क करू शकत नाहीये मात्र, त्यांच्या या चालीमुळे उद्धव सरकार अडचणीत सापडल्याचे दिसत आहे. त्यामुळे सरकार ने ही टोकाची भूमिका घेतली आहे..