जळगाव राजमुद्रा दर्पण | नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे जवळपास 40 आमदार घेऊन फरार झाले आहेत , त्यामुळे राज्यातील राजकारणात खळबळजनक वातावरण निर्माण झाले आहे , एकनाथ शिंदे यांची समजूत घालण्याचा खूप प्रयत्न सुरु आहे तरी अद्याप ते समजून घेणार असं काही वाटत नाहीये , या दरम्यात कालपर्यंत मुख्यमंत्र्यांच्या सोबत असलेले जळगाव चे पालकमंत्री गुलाबराव पाटील देखील आज नॉट रीचेबल झाल्याचे समजते आहे .
नगरमंत्री एकनाथ शिंदे गेल्या काही महिन्यांपासून नाराज असल्याचे समजत होते, त्याच्या कामात आणि नगरविकास खात्यात वारंवार होणाऱ्या ढवळाढवळला ते खूप कंटाळले होते असे दिसून येत होते.ही समस्या त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे देखील मांडली होती पण पक्षप्रमुखांनी ही बाब मनावर घेतली नाही त्यामुळे एकनाथ शिंदे जवळपास 40 आमदारांना घेऊन त्यांनी बंडखोरी केली असे लक्षात आले आहे.
या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांसोबत असलेले काही आमदार व मंत्री हे देखील एकनाथ शिंदें सोबत जाणार आल्याचे वृत्त येत होते त्यासोबत जळगाव चे पालकमंत्री गुलाबराव पाटील देखील शिंदे यांच्या सोबत असंल्याचे वार्ता येत होत्या पण मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या बैठकीत ते दिसून आले त्यामुळे हे पसरणारे वृत्त खोटे असल्याचे सिद्ध झाले होते .
या दरम्यात आज पालकमंत्री गुलाबराव पाटील देखील आज नॉट रीचेबल झाल्याचे दिसून येत आहे ,एका मीडिया अहवालानुसार मुंबईहुन जळगाव ला येण्यासाठी निघालेल्या जिल्हयाचे पालकमंत्री गुलाबराव पाटील नॉट रीचेबल असल्याचे सांगण्यात येत आहे .