महाराष्ट्रात राजकीय संकट सुरूच आहे. दरम्यान, राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना बुधवारी कोरोनाची लागण झाली. त्यांना सकाळी दक्षिण मुंबईतील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. राजभवनच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, “गेल्या काही दिवसांपासून त्यांना ताप येत होता, अशक्तपणा आणि खोकला होता. काल त्यांचा स्वॅब घेण्यात आला आणि रात्री उशिरा अहवाल आला. डॉक्टरांनी चांगल्या देखरेखीसाठी रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला दिला आहे.” अधिकाऱ्यांनी सांगितले की, राज्यपाल कोश्यारी यांना रिलायन्स फाऊंडेशन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.