महाराष्ट्रात सध्या सुरू असलेल्या राजकीय पेचप्रसंगात कोरोनाचा स्फोट झाला आहे. पहिले राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे कोरोना पॉझिटिव्ह आले. आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कोरोनाची लागण झाल्याची बातमी समोर येत आहे. नाना पटोले आणि कमलनाथ यांनी ही माहिती दिली आहे.
नाना पटोले काय म्हणाले :-
त्यांनी आताच कमलनाथ यांच्याशी चर्चा केली असता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आज कोरोनाची लागण झाली आहे, तरीही आज होणाऱ्या दुपारच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत ते व्हर्चुअली सहभागी होतील ,विधानसभा बरखास्त होण्याचा अजून असा कोणताही विचार नाहीये ,पूर्ण ताकद लाऊन सरकार चालवू असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आम्हला सांगितलं ,असे नाना पटोले म्हणाले
महाराष्ट्रात सुरू असलेल्या राजकीय संकटादरम्यान, कोश्यारी यांना कोरोना ची लागण..