जळगाव राजमुद्रा दर्पण : शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्या भूमिके नंतर राज्यात सत्तांतर होणार हे निश्चित मानले जात आहे. जळगाव जिल्ह्यातील एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेबाबत मोठ्या प्रमाणात पाठिंबा दर्शविला जात आहे. तर दुसरीकडे शिवसेना कार्यकर्ते नेमके कोणाच्या पाठीशी जायचे याबाबत संभ्रमात आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून जळगाव मधील एकनाथ शिंदे यांचे समर्थक असलेले हर्षल मावळे यांनी थेट सोशल मीडियावर डिजिटल पोस्टर व्हायरल करीत एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेबाबत पाठिंबा जाहीर करीत आय सपोर्ट शिंदे साहेब असे डिजिटल पोस्टर वायरल केले आहे. त्यामुळे जळगावातील एकनाथ शिंदे समर्थक असलेले हर्षल मावळे अधिक चर्चेत आले आहे.
एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेमुळे माक्स लीडर असल्याचे आता बोलले जात आहे. शिंदे यांच्या भूमिकेमुळे शिवसेनेला मोठा फटका बसणार आणि उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपदावरून पायउतार व्हावे लागणार का याकडे आता संपूर्ण देशाचे लक्ष लागून आहे. शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांना मानणारा जळगाव जिल्ह्यात मोठा वर्ग आहे यामध्ये त्यांचे कट्टर समर्थक मानले जाणारे हर्शल मावळे यांच्यासह अनेकांनी शिंदे यांच्या महायुतीत सामील होण्याच्या भूमिके ला पाठिंबा दर्शवला आहे. जळगाव महापालिकेत शिवसेनेची सत्ता आणून सत्तांतर करण्यात एकनाथ शिंदे यांचा मोठा वाटा आहे.
राज्यभरात एकनाथ शिंदे यांना मानणारा मोठा वर्ग आहे त्यामुळेच सेनेतील जळगाव जिल्ह्यातील पाच आमदार शिंदे यांच्या गटात सामील झाले आहेत पालकमंत्री गुलाबराव पाटील पाचोरा चे आमदार किशोर पाटील चोपड्याच्या आमदार लता सोनवणे मुक्ताईनगर चे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख व आमदार चंद्रकांत पाटील पारोळा येथील आमदार चिमणराव पाटील हे पाचही शिवसेनेचे प्रमुख चेहरे गुहाटी येथे शिंदे यांच्या गटात सामील झाल्याचे सांगितले जात आहे याबाबत जळगाव जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकार्यांची संपर्क साधला असता त्यांनी देखील या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
सकाळीच सुरत विमानतळावरून एकनाथ शिंदे चाळीस आमदारांसह गुहाटीकडे रवाना हहले होते यानंतर गुहाटीकडे येथे दाखल होताच शिंदे यांनी माध्यमांमध्ये हिंदत्वा च्या विचारांवर शेवट पर्यत राहणार असून आदरणीय बाळासाहेब व दिघे साहेबांनी दिलेल्या शिकवणी वरून पायवाट करणार असल्याचे सांगितले होते.