राज्यात सत्तांतर बदलाचे संकेत मिळत आहेत असे असतांना जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता गुलाबराव पाटील हे येथील शिंदे या ठिकाणी थांबले आहेत हॉटेलमध्ये दाखल झाले आहेत त्यांच्यासोबत जळगाव मुक्ताईनगर येथील आमदार चंद्रकांत पाटील यासोबतच येथील साक्री तालुक्यातील आमदार मंजुळा गावित ह्या एकनाथ शिंदे यांच्या गटात दाखल झाले आहेत.
गुवाहाटी येथे एका प्रतिष्ठित हॉटेल मध्ये शिवसेना तसेच काही अपक्ष आमदाराची व्यवस्था करण्यात आली आहे. यामध्ये राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या समवेत आणखी दोन धुळे व जळगाव येथील अपक्ष आमदारांचा समावेश आहे.
खुद्द बंडखोर नेते एकनाथ खडसे हे त्यांना घेण्यासाठी हॉटेल बाहेर आल्याचे व्हिडीओ व्हायरल झाले आहे. जिल्ह्यातील शिवसेनेचे सर्वच आमदार हे शिंदे यांच्या गटात दाखल झाल्याने शिंदे गटाचे संख्याबळ वाढले आहे. यामुळे शिंदे गटाकडे अपेक्षे पेक्षा अधिक संख्याबळ झाल्याने सत्ता स्थापनेचा दावा करण्यास शिंदे गट अधिक सक्षम झाला आहे.