(जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मराठा आरक्षण प्रश्नी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यावर चंद्रकांत पाटील यांनी, ‘आम्हाला वाघाशी मैत्री करायला आवडेल’, असे वक्तव्य केले होते. त्यावर प्रतिक्रिया देताना आज एकनाथ खडसे यांनी चंद्रकांत पाटलांना चांगलाच टोला लगावला असून चंद्रकांत दादा आपल्या मतावर ठाम नसतात असे सांगितले.
“चंद्रकांत दादांचा कोणतेही धोरण निश्चित नसते. ते आज वाघा बरोबर मैत्री करायचं म्हणत आहेत, मात्र पुढे जाऊन त्याच वाघावर टीका करण्यासही कमी करणार नाहीत. त्यांनी निश्चित असं धोरण ठरवलं, निश्चित अशी दिशा ठरवली तर आपल्याला त्यावर वक्तव्य करता येईल” असे वक्तव्य एकनाथ खडसे यांनी जळगावात केले. राष्ट्रवादीच्या २२ व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने ते आज जळगाव येथे राष्ट्रवादी कार्यालयात उपस्थित होते. त्यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले.