जळगाव राजमुद्रा दर्पण | गुवाहाटी येथून राज्याचे राजकीय समीकरण बदलण्याला सुरुवात झाली आहे. असताना प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख बच्चू कडू हे देखील त्यांच्या अपक्ष आमदारांसह एकनाथ शिंदे गटात सामील झाले आहे. त्यांच्यासमवेत प्रहार जनशक्ती पक्षाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष अनिल चौधरी देखील मंत्री बच्चू कडू यांच्या समवेत ठाण मांडून आहेत. चौधरी यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी लवकरच सुरू असलेल्या घडामोडींवरून राज्यात सत्तापालट होणार असल्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे प्रहार जनशक्ती पक्ष आगामी काळात सत्ताधारी गटात घटक पक्ष म्हणून काम पाहणार का ? अनिल चौधरी यांचे सोशल मिडियावर व्हायरल झालेलं फोटो चर्चेचा विषय बनला आहे.
अनिल चौधरी हे भुसावळ नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष म्हणून त्यांनी कामकाज पाहिले आहे. नुकतेच त्यांनी प्रहार जनशक्ती पक्षात प्रवेश केला आहे नुकतेच प्रहार च्या संघटना वाढीसाठी त्यांनी मंत्री बच्चू कडू यांच्या उपस्थितीत भुसावळ येथे मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन केले होते. यामुळे प्रहार जनशक्ती पक्ष आगामी काळात उत्तर महाराष्ट्रात अधिक सक्रिय होणार असल्याचे संकेत दिले आहे. अनिल चौधरी यांचा सर्वाधिक प्रभाव हा भुसावळ रावेर यावर या भागात अधिक असून उत्तर महाराष्ट्रात संघटना वाढीसाठी त्यांच्यावर दायित्व सोपविण्यात आले आहे. मंत्री बच्चू कडू यांचे विश्वासू सहकारी म्हणून ते सध्या गुवाहाटी येथे त्याच्या सोबतच असल्याचे फोटो व्हायरल झाले आहे.
एकनाथ शिंदे गटात मोठ्या प्रमाणात आमदारांचे इन्कमिंग सुरू असून आणखी काही जण शिवसेनेतून शिंदे गटाकडे जाण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहेत नुकतेच शिवसेनेचे आमदार जयस्वाल यांच्या समवेत आणखी तीन आमदारांनी शिंदे गटात गुवाहाटी येथे जाऊन समर्थन दिले आहे. यामुळे एकनाथ शिंदे हे गट स्थापन करून आगामी काळात सत्ता स्थापन करणार हे निश्चित मानले जात आहे.
जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील हे उद्धव ठाकरे यांचा संदेश घेऊन शिंदे यांच्याकडे गेल्या ची माहिती देण्यात आली होती. मात्र माध्यमांमध्ये खुद्द गुलाबराव पाटील यांनी “सगळे तिकडे गेले… मी एकटा काय करू.. मी पण गुवाहाटी ला चाललो” असे विधान त्यांनी केले होते, कालच शिवसेनेचे आमदार मुक्कामी असलेल्या हॉटेलमध्ये मुक्ताईनगर चे आमदार चंद्रकांत पाटील, धुळे येथील आमदार मंजुळा गावित, आमदार योगेश कदम यांच्यासमवेत शिंदे गटात ते सामील झाले आहे. यामुळे शिंदे गटाचे पारडे अधिक जड झाले आहे.