जळगाव राजमुद्रा वृतसेवा | राज्यात सत्ता आल्यावर ज्या प्रमाणे राजकीय पक्षांमध्ये वरिष्ठ नेत्यांची हुजरेगिरी करण्यासाठी गटबाजीला उधान येते, अगदी त्याच पार्श्भूमीवर पदाधिकाऱ्यांच्या नव नियुक्ती वरून शिवसेनेत गटबाजी उफाळून आली आहे, यामध्ये ज्यांनी पक्ष उभारणी करीता आंदोलन व विविध विषयावरून पोलीस केस घेतल्या नेमक त्याच पदाधिकाऱ्या व कार्यकर्त्यांना डावलण्यात आल्याने शिवसेनेत प्रचंड नाराजी पसरली आहे, पक्षाचे मुख्य प्रवक्ते राज्यसभा खासदार संजय राउत हे जळगाव जिल्हा दौऱ्यावर असताना पक्षात पसरलेली नाराजी व गट-बाजी त्यांच्या दौऱ्या निमित्ताने उफाळून येण्याची दाट शक्यता आहे.
संजय राउत जिल्हा दौऱ्यावर
शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते राज्यसभेचे खासदार sanjay राउत हे जळगाव जिल्हा दौऱ्यावर येत आहे सेने तर्फे नुकतेच नियुक्ती केलेले पदाधिकारी यांची भेट घेऊन आढावा बैठक घेणार आहे, जिल्ह्यात शिवसेनेने केलेली आगेकूच व महापालिकेत केलेले सत्ता बदल या नंतर सेनेतील आत्मविश्वास अधिक वाढला असून प्रथमच राउत हे जिल्हात येत आहे. आगामी काळात निवडणुकांचे बिगुल वाजणार असल्याने त्यांचा जिल्हा दौरा महत्वपूर्ण मानला जात आहे.
नाराज गट राउत यांची भेट घेणार ?
शिवसेनेकडून ज्या पदाधिकाऱ्याना पदे देण्यात आली त्यांनी पक्षासाठी लक्षणीय असे कोणते कार्य केले जिल्ह्यात पक्ष उभारणीत त्यांचे काय योगदान ? संपर्क प्रमुख संजय सावंत यांनी विश्वासात न घेता कशाच्या आधारावर पदाधिकाऱ्यांची यादी निश्चित करून मुंबईला पाठवली ? का म्हणून आमच्या सोबत भेदभाव केला जातोय ? असे विविध प्रश्न राजमुद्राशी खाजगीत काही जुन्या निष्ठावंत असलेल्या माजी पदाधिकाऱ्यानी मांडली आहे. या प्रकरणी काही आजी-माजी नाराज पदाधिकारी झालेल्या अन्यायाबाबत संजय राउत यांची भेट घेण्याची शक्यता आहे.
सेनेत घराचा आहेर
पाचोरा मतदार संघाचे शिवसेना आमदार किशोर पाटील यांनी देखील स्वपक्षा विरोधात दंड थोपटून महावितरण कार्यालयाला कुलूप टोकले, शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे हे स्वतः मुख्यमंत्री असताना आमदार किशोर पाटील यांनी थेट उद्धव ठाकरे यांना घराचा आहेर देत आंदोलन छेडले यामुळे पदाधिकारी नियुक्ती वरून पक्षाबाबत त्यानी प्रत्यक्षात नाराजी व्यक्त केली असल्याच्या राजकीय चर्चा रंगल्या आहेत.