सध्या राज्यात राजकीय खळबळजनक वातावरण सुरु आहे , शिवसेनेतील अंतर्गत मतभेत जनतेसमोर आले आहेत , शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी तब्बल 46 आमदारांना सोबत घेऊन बंडखोरी केल्यानंतर त्यांनी आपला वेगळा गट स्थापन केला आहे.
या पार्श्वभूमीवर अमरावतीच्या नवनीत राणा यांनी नुकतीच अमित शहा यांची भेट घेऊन महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली आहे , यावर टिपण्णी करत शिवसेना नेत्या दिपाली सय्यद यांनी आपल्या ट्विटर अकाउंट च्या माध्यमातून नवनीत राणा यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे
या ट्विट मध्ये दिपाली सय्यद यांनी लिहिला आहे की ” राणा बाईला शिवसेना नावाचा रोग झाला आहे . राष्ट्रपती राजवट लावण्याची घाई झाली आहे, बाई थोडी कळ काढा हि शिवसेनेची शाळा आहे, सुट्टीवर गेलेली पोर परत येतील आल्यानंतर पहिले तुमचा अमरावतीतून सुफडा साफ करतील. बोगस कागदपत्रे.. ”
राणा बाईला शिवसेना नावाचा रोग झाला आहे. राष्ट्रपती राजवट लावण्याची घाई झाली आहे. बाई थोडी कळ काढा हि शिवसेनेची शाळा आहे, सुट्टीवर गेलेली पोर परत येतील आल्यानंतर पहिले तुमचा अमरावतीतुन सुफडा साफ करतील. बोगस कागदपत्रे… @AmitShah @BJP4Maharashtra @ShivSena
— Deepali Sayed (@deepalisayed) June 26, 2022
दरम्यात , नवनीत राणा म्हणाल्या की , ” बंडखोर आमदारांचा कुटुंबियांना केंद्राची सुरक्षा द्यायला हवी. राज्यातील संघर्ष पाहता महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करा”, यावर दिलीप वळसे पाटील यांनी राज्यातील राजकीय संघर्ष पाहता महाराष्ट्रातील आमदारांचे संरक्षण काढण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी किव्हा गृहमंत्रालयाने दिलेले नाही आहे , असे स्पष्ट केले