जळगाव राजमुद्रा दर्पण | राज्यात सुरु असलेल्या घडामोडींचे पडसाद जळगाव ला सुरुवात झाली आहे थेट संपर्क प्रमुख यांच्या राजीनाम्याची मागणी भाजपचे बंडखोर नगरसेवक नवनाथ दारकुंडे यांनी केल्याने खळबळ उडाली होती मात्र त्याला प्रत्युत्तर म्हणून उद्योजक तसेच शिवसैनिक खूप छान साहित्य यांनी 20 लाखात विकणार यांनी स्वतःला अगोदर झाकून बघावं असे प्रत्युत्तर राजीनामा मागणाऱ्या नगरसेवक दारकुंडे यांना दिले आहे त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे दारकुंडे यांनी जळगाव जिल्ह्याचे संपर्कप्रमुख संजय सावंत यांचा राजीनामा मागितल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे यामुळे संजय सावंत यांचे निकटवर्तीय असलेले खूप छान साहित्य चांगलेच आक्रमक झाल्याचे व्हिडिओ मधून दिसून येत आहे.
शिवसेना बाळासाहेबांची आहे डुप्लिकेटांची नाही, अशा मथळ्याचे बॅनर संपूर्ण जळगाव शहरात संपर्कप्रमुख संजय सावंत यांनी यांनी लावले. याची जिल्ह्या भरात चर्चा झाली. संपर्कप्रमुख संजय सावंत यांनी शिवसेनेशी बंडखोरी केलेले एकनाथ शिंदेंवर निशाणा साधला आहे. अशावेळी एकनाथ शिंदे यांच्यामुळे भाजपातून शिवसेनेत आलेले बंडखोर नगरसेवक नवनाथ दारकुंडे यांनी संजय सावंत यांच्या संपर्कप्रमुख म्हणून असलेल्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. संपर्क प्रमुख खाजगी हॉटेलात पार्ट्या झोडतात म्हणत दारकुंडे यांनी सोशल मिडियावर पोष्ट व्हायरल केले होते. थेट संपर्क प्रमुखांवर आरोप होत असल्याने शिवसैनिक उद्योजक खुबचंद साहित्या यांचा एक व्हिडिओ व्हायरल प्रचंड व्हायरल झाला असून २० लाखात विकलेले काय सावंत साहेबांवर बोट ठेवणार असे म्हणत त्यांनी नाव न घेता बंडखोरांवर टीका केली आहे.
काय म्हणाले होते दारकुंडे ?
नगरसेवक नवनाथ दारकुंडे मेसेजद्वारे म्हणाले की, मी नवनाथ विश्वनाथ दारकुंडे नगरसेवक जळगाव महानगरपालिका आजच्या राजकीय घडामोडीवर एक प्रश्न विचारू ईच्छितो, संजय सावंत हे जळगाव जिल्हा संपर्कप्रमुख आहे त्यांच्या जिल्ह्यातील पाचही आमदार मंत्री शिंदे गटात सामील झाले मग पक्षनेते त्यांचा राजीनामा घेणार आहे का? नैतिक जबाबदारी स्वीकारून संजय सावंत राजीनामा देणार का? जळगावमध्ये ते बॅनरबाजी करताय मग ते आजपर्यंत कुठे गेले होते? एका खाजगी हॉटेल मध्ये बसुन ते पार्ट्या झोडतात तेव्हा त्यांना पक्ष दिसला नाही का? तरी माझी मागणी आहे की संजय सावंत यांनी आपल्या संपर्कप्रमुख पदाचा त्वरित राजीनामा द्यावा, अशी जाहीर मागणी दारकुंडे यांनी केली होती.