राज्यात सुरु असलेला राजकीय तेढ बघता शिवसेना पक्षात फूट पडलेली आहे , त्यातच शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढाई बघायला मिळत आहे . या दरम्यात गेल्या दोन दिवसांपूर्वी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी गुलाबराव पाटील यांच्यावर ‘गुलाबराव पाटलाला पुन्हा पान टपरीवर बसायला लावेल ‘ असे वक्तव्य केले होते व त्या वक्तव्याचे जळगावात पडसात देखील पाहायला मिळाले. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या समर्थकांनी संजय राऊत यांचे पुतळे जाळून आंदोलन केलीत. याच पार्श्वभूमीवर नुकताच गुलाबराव पाटलांचा गुवाहाठी वरून एक व्हीडिओ व्हायरल झाला आहे, यात गुलाबरावांनी संजय राऊत यांना प्रत्युत्तर देत म्हणाले की , ‘चुना कसा लावतात हे संजय राउतला माहिती नसून वेळ येऊ द्या त्याला चुना लावून दाखल ‘
त्यात गुवाहतीत झालेल्या बैठकीत ‘ मुख्यमंत्र्यांनी वर्षा बंगला सोडला, त्यांनी आम्हा 52 आमदारांनाही सोडला ,पण तरी देखील ते पवारांना काही सोडायलाच तयार नाहीत अशी नाराजी गुलाबराव पाटलांनी व्यक्त केली आहे . त्याच सोबत शिवसेने साठी केलेल्या संघर्षाची गाथा देखील त्यांनी मांडली.