जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा | महापालिकेतील बंडखोर नगरसेवकांनी मुंबईत जाऊन थेट शिवसेनेतून बंडखोरी केलेले एकनाथ शिंदे गुलाबराव पाटील यांना पाठींबा दर्शविला आहे. एवढेच नाही आम्ही जरी जळगाव महापालिकेत सत्ता स्थापनेसाठी शिवसेनेला पाठींबा दिला असला तरी आम्ही एकनाथ शिंदे साहेब व गुलाबराव पाटील यांच्या सोबत असल्याची भूमिका बंडखोर नगरसेवकांनी शिंदे यांचे पुत्र खा. श्रीकांत शिंदे यांची भेट घेत जाहीर केली आहे.
जळगाव महापालिकेत भाजपच्या एकूण 27 बंडखोर नगरसेवकांनी महापौर निवडणुकी वेळी भाजप सोबत बंडखोरी करीत शिवसेनेचा महापौर पदाच्या उमेदवार जयश्री महाजन यांना मतदान केले होते. भेट घेणाऱ्यांमध्ये नगरसेवक दिलीप पोकळे प्रतिभा देशमुख, नवनाथ दारकुंडे, रेश्मा काळे, ज्योती चव्हाण,चेतन सनकत, अंबरनाथचे नगरसेवक सुनील चौधरी यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी भेट घेतली आहे. शिंदे गटाला पाठींबा असल्याचे पत्र खा.श्रीकांत शिंदे यांना दिल्याचे सांगितले गेले आहे.
राज्यात सत्तापालट होत असताना बडखोरांमधील कार्यवाही होणार म्हणून भीतीदायक वातावरण असताना नेमकं कोणासोबत जावे याबाबत संभ्रम निर्माण झाला होता मात्र शिंदे यांच्या नेतृत्वात भाजपमधून बंडखोरी केल्याने आम्ही त्याच्या सोबतच जाणार असल्याची भूमिका महापालिकेतील बडखोरांनी जाहीर केली आहे.