शिवसेनेच्या बंडखोर आमदारांनी गुवाहाटीतील हॉटेल सोडले आहे. ते बसने निघाले आहेत आणि विमानतळावरून चार्टर्ड फ्लाइटने गोव्याला जाऊ शकतात. उद्या महाराष्ट्र विधानसभेची फ्लोर टेस्ट आहे, त्या पार्श्वभूमीवर बंडखोर आमदार मुंबईच्या जवळ येत आहेत. गुवाहाटीतील बंडखोर आमदारांसाठी चार्टर्ड विमान स्टँडबाय मोडवर ठेवण्यात आले होते.
गुवाहाटी विमानतळावर बंडखोर नेते एकनाथ शिंदे म्हणाले की, “आम्ही उद्या मुंबईत पोहोचू आणि विश्वासदर्शक ठरावात सहभागी होऊ. त्यानंतर विधीमंडळ पक्षाची बैठक होईल, त्यानंतर पुढील कृती ठरवली जाईल.” शिंदे म्हणाले, ”आम्ही बंडखोर नाही. आम्ही शिवसेना आहोत. बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचा अजेंडा आणि विचारधारा आम्ही पुढे नेत आहोत. आम्ही हिंदुत्वाच्या विचारधारेसाठी आणि राज्याच्या विकासासाठी काम करू.
#WATCH | Assam: Rebel Maharashtra MLAs raise slogans of "Chhatrapati Shivaji Maharaj ki jai" and "Eknath Shinde sahab tum aage badho, hum tumhare saath hain", as they arrive at Guwahati airport. pic.twitter.com/GkT9lguY3V
— ANI (@ANI) June 29, 2022
शिवसेना आमदारांचा पुढचा मुक्काम गोव्यातील ताज रिसॉर्ट आणि कन्व्हेन्शन सेंटर असू शकतो. याठिकाणी 70 खोल्या बुक झाल्याची माहिती आहे. गोव्यात भाजपचे सरकार आहे आणि हे शहर मुंबईपासून जवळ आहे. म्हणजे बंडखोर आमदारांसाठी गोवा हे सोयीचे ठिकाण ठरणार आहे. मुंबईतील शिवसेना समर्थकांचा गोंधळ पाहून बंडखोर आमदारांना तिकडे जाणे सुरक्षित वाटत नसल्याने ते गोव्याला जात आहेत.
We will reach Mumbai tomorrow and participate in the Trust Vote. After that, a meeting of the Legislative Party will be held, following this the further course of action will be decided: Eknath Shinde, at Guwahati airport pic.twitter.com/cAYz4pJBG0
— ANI (@ANI) June 29, 2022
शिवसेनेच्या वकिलांचा सुप्रीम कोर्टात युक्तिवाद ; उद्या फ्लोअर टेस्ट झाली नाही……