जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा | शहरातील द्रोपदी नगरातील जय हिंद कॉलनी येथे पाण्याची मोठ्या प्रमाणात नासाडी होत असून याकडे महापालिकेसह स्थानिक नगरसेवकांनी दुर्लक्ष केलेले दिसून येत आहे उन्हाळ्याच्या दिवसात पाण्याची कमतरता असताना दोन दिवसा आड पाणीपुरवठा केला जात असून ज्यावेळी महापालिकेकडून पाणी पुरवठा केला जातो त्यावेळी मोठ्या प्रमाणात पाण्याची नासाडी होते आहे याकडे महापालिका प्रशासनाने तातडीने लक्ष घालुन उपायोजना करण्याची गरज आहे वेळेत उपाययोजना झाल्यास पाणीगळती थांबणार आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेमध्ये प्रवेश देण्यास मज्जाव करण्यात आला आहे यामुळे सर्वसामान्य नागरिकांना लेखी तक्रार द्यायचे असल्यास तक्रार द्यायची कुणाला हा सवाल उपस्थित केला जात आहे. लोकप्रतिनिधींना सांगितले असता त्यांच्याकडून देखील दिरंगाई केली जात आहे.
महापौर जयश्री महाजन यांनी नागरिकांच्या तक्रारी निवारण करण्यासाठी वॉर रूम तयार केला आहे. वॉर रूम सुरु होऊन अद्याप पर्यंत दोन दिवस झाली आहे पालक मंत्री गुलाबराव पाटील यांच्या शुभहस्ते या तक्रार निवारण केंद्राचे लोकार्पण करण्यात आले मात्र पाहिजे तेवढी जनजागृती या संदर्भात झालेली नाही महापौरांनी आदर्श उपक्रम राबवत नागरिकांना थेट व्हाट्सअप फेसबूक टेलिग्राम च्या माध्यमातून तक्रार करता येणार आहे कमी वेळेत जास्तीत जास्त समस्या या ठिकाणी सोडवण्यात येतील नागरिकांनी या सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन महापौर जयश्री महाजन यांनी केले आहे.