शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे हे भाजप नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह राजभवनात पोहोचले आहेत. थोड्याच वेळात ते राज्यपालांसमोर सरकार स्थापनेचा दावा करणार आहेत. वृत्तानुसार, फडणवीस आणि एकनाथ शिंदे आज संध्याकाळी 7 वाजता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. देवेंद्र फडणवीस यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेण्यासाठी एकनाथ शिंदे आज गोव्याहून मुंबईत पोहोचले. दोन्ही नेते आता राजभवनात पोहोचल्यानंतर राज्यपालांची भेट घेत आहेत आणि आता सरकार स्थापनेचा दावा करणार आहेत.
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात सुरू असलेले राजकीय पेच उद्या संपुष्टात येऊ शकते, असे मानले जात आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊ शकतात. भाजपचे नेते गिरीश महाजन म्हणतात की, पक्षाला 170 आमदारांचा पाठिंबा आहे. तर बहुमतासाठी 145 चा आकडा असणे आवश्यक आहे.
फडणवीस आणि एकनाथ शिंदे राजभानवर पोहोचले :-
Mumbai: Eknath Shinde met BJP leader Devendra Fadnavis at the latter's residence, this evening pic.twitter.com/BSiW25H9cU
— ANI (@ANI) June 30, 2022
देवेंद्र फडणवीस होणार तिसऱ्यांदा मुख्यमंत्री! :-
एकीकडे एकनाथ शिंदे फडणवीस यांच्या निवासस्थानी पोहोचले आहेत, तर दुसरीकडे आज मुंबईत मातोश्रीवर पोहोचल्यानंतर महाराष्ट्र काँग्रेसचे नेते आणि आमदारांनी शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. उध्दव ठाकरे यांनी बुधवारी रात्री सोशल मीडियावर आपल्या राजीनाम्याची घोषणा केली होती. उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्यामुळे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार हे जवळपास निश्चित झाले आहे. वृत्तानुसार, शिंदे कॅम्पच्या पाठिंब्याने स्थापन होणाऱ्या नव्या सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची सूत्रे हाती घेतील. भाजपच्या 6 आणि शिंदे कॅम्पच्या 6 आमदारांना नव्या मंत्रिमंडळात स्थान मिळू शकते.