(जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा) “वृक्षांना पालक समजून त्यांचे संगोपन करा” असे भावनिक आवाहन जळगाव शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य ए. आर. चौधरी यांनी आज वृक्षारोपण प्रसंगी केले. निसर्ग, पर्यावरण व सामाजिक प्रदूषण निवारण मंडळ, श्री. अष्टांग योग समिती व जनमत प्रतिष्ठान जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने प्रा. अविनाश कुमावत यांचा ५७ व्या वाढदिवसानिमित्त जळगाव येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था प्रांगणात नीम, पिंपळ, चिंच, आवळा व औदुंबर या प्रजातीच्या रोपांचे वृक्षारोपण करण्यात आले.
याप्रसंगी प्रा. अविनाश कुमावत यांसह निसर्ग पर्यावरण जिल्हा संस्थाध्यक्ष नाना पाटील, राज्य सल्लागार प्रभाकर कुमावत, योगशिक्षक डॉ. गोपाळ पाटील, योगशिक्षक चंद्रकांत सुरडकर, निसर्ग पर्यावरण संस्थेचे जिल्हा सहसचिव विजय लुल्हे, जळगाव शहराध्यक्ष पंकज नाले, प्रा.संजय कुमार सिंग, आय.टी.आयचे दिवाकर भिरुड आदी मान्यवरांनी वृक्षारोपण केले. वाढदिवसानिमित श्री. अष्टांग योग समिती तर्फे कुमावत यांनी प्राचार्य चौधरी यांना वृक्षदान केले. प्रस्तावना व सूत्रसंचालन पंकज नाले व आभार प्रदर्शन नाना पाटील यांनी केले.