जळगाव : मेहरुण येथील श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालयामध्ये गुरुपौर्णिमेनिमित्त मातृ पूजनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विद्यार्थ्यांनी आपला ‘प्रथम गुरु, आपली आई’ म्हणून पाद्यपूजन करून तिच्या भोवती प्रदक्षिणा घालून नमस्कार केला. तसेच विद्यार्थ्यांनी शिक्षकांना फुल देऊन वंदन केले.
सुरुवातीला श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन मुख्याध्यापिका शितल कोळी यांच्या हस्ते करण्यात आले. यानंतर विद्यार्थ्यांनी त्यांच्या आईला वंदन करून पाद्यपूजन केले. त्याचबरोबर शिक्षकांनाही फुल देऊन त्यांचे आशीर्वाद घेतले. यावेळी विद्यालयात भावपूर्ण वातावरण तयार झाले होते. गुरुपौर्णिमेचे महत्त्व मुख्याध्यापिका शितल कोळी यांनी विद्यार्थ्यांना सांगितले.
कार्यक्रमाचे नियोजन उपशिक्षक तथा संस्थेचे सचिव मुकेश नाईक यांनी केले. सोनाली चौधरी, स्वाती नाईक, प्रियंका जोगी, सोनाली जाधव, कोमल पाटील, पुनम निकम, मेघा सोनवणे, जयश्री खैरनार, शिल्पा कोंगे, योगिता सोनवणे आदींनी सहकार्य केले.