रावेर राजमुद्रा दर्पण – बहुचर्चित पंचायत समितीच्या भ्रष्ट्राचार प्रकरणात पोलिसांनी अटकसत्राची दिशा आता पंचायत समितीकडे वळवली आहे.आधीच लेखाधिकारी गट समन्वयक अटकेत असतांना यात आता दोन विस्तार अधिका-यांची भर पडली आहे.रात्री उशिरा दोघां अटक करण्यात आली असुन.एकूण आरोपींची संख्या बारा वर पोहचली आहे.यापैकी दहा आरोपींची पोलिस कस्टडी आज संपत आहे.
ग्रामीण जनतेला तालुकास्तरावरुन शौचालय योजनेच अनुदान वर्ग करण्यात गट समन्वयक समाधान निंभोरे समहु समन्वयक मंजुश्री पवार तसेच ग्राम पंचायत तत्कालिन विस्तार अधिकारी दिनकर सोनवणे व दिपक संदाशु तसेच लेखाधिकारी लक्ष्मण पाटील व शेवटी गट विकास अधिकारी या सर्वांची अनुदान वर्ग करण्यात महत्वाची भूमिका असते संपूर्ण राज्यभर हा शौचालय योजनेचा भ्रष्ट्राचार गाजत आहे. या संपूर्ण गुन्ह्याचा तपास पोलिस निरिक्षक कैलास नागरे यांच्या मार्गदर्शना खाली तपास अधिकारी सह.पोलिस निरीक्षक शितलकुमार नाईक करीत असुन पोलिस प्रशासनाच्या या संपर्ण कारवाईवर जिल्हातील जनतेच्या नजरा असुन होत असलेल्या कारवाई बद्दल समाधान व्यक्त केले जात आहे.
गुन्ह्याच्या तपासात आता पर्यंत काय काय घडले –
आता पर्यंत भ्रष्ट्राचार प्रकरणात गट समन्वयक समाधान निंभोरे (अटकेत)आहे.समहु समन्वयक मंजुश्री पवार पसार आहे.लेखाधिकारी लक्ष्मण पाटील (अटकेत) आहे. तत्कालिन सेवानिवृत्त ग्राम पंचायत विस्तार अधिकारी दिनकर सोनवणे व सद्या रावेर पंचायत समितीत ग्राम पंचायतचे विस्तार अधिकारी असलेले दिपक संदाशु दोघांना रात्री अटक करण्यात आली आहे.या प्रकरणी आठ पंटर देखिल अटकेत आहे.यामुळे निष्काळजीपणा करून पंचायत समिती मधील अनुदान टाकणारी सिस्टीम व अनुदानाचा वारंवार लाभ घेणारी लाभार्थी दोघ बाजूने अटकसत्र राबविले जात आहे.यामुळे संपूर्ण तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.