जळगाव राजमुद्रा दर्पण – पाळधीमधील सर्व शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिक यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व माजी मंत्री आ.गुलाबरावजी पाटील यांच्या समर्थनार्थ सामूहिक राजीनामे व शिंदे गटाला समर्थन देण्याचे ठरवले आहे . यात पाळधीचे विश्वनाथ महाजन उर्फ आबा माळी, चंदू इंगळे, पिटु कोळी, हर्षल पाटील, पप्पू माळी, दीपक श्रीखंडे, अरुण पाटील, प्रशांत झंवर, चंदन कळमकर, दानिश पठाण, गजानन ठाकूर, संजय महाजन, इत्यादी पदाधिकारी आहेत ज्यांनी राजीनामा दिला आहे .
राजीनाम्यात काय म्हटले :-
आम्ही माजी मंत्री आ. गुलाबरावजी पाटील यांचा खंदे समर्थक असून गुलाबभाऊंनी आमच्या गावासाठी मागितली ती विकासकामे व मदत केलेली आहे. आमच्या सर्व सुखदुःखात माजी मंत्री आ. गुलाबरावजी पाटील, त्यांचे चिरंजीव जिप सदस्य प्रताप गुलाबरावजी पाटील हे सदैव हजर असतात. त्यामुळे आम्ही राजीनामा देत आहे
असे सर्वांनी सांगितले ..