(एरंडोल राजमुद्रा वृत्तसेवा) एरंडोल शहराच्या इतिहासात सर्वाधिक विकासकामे केली असल्याचे प्रतिपादन आमदार चिमणराव पाटील यांनी केले आहे. आज शहरात आमदार निधीतून विविध विकास कामांचे भूमिपूजन चिमणराव पाटील यांची हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.
शहरातयुवा सेना प्रमुख, तथा राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आमदार निधीतून विविध विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले. याप्रसंगी महिला आघाडी जिल्हा प्रमुख महानंदा पाटील, बाजार समिती सभापती अमोल पाटील, तालुका समिती समन्वय अध्यक्ष रमेश महाजन, माजी नगरअध्यक्ष किशोर निंबाळकर, ज्ञानेश्वर आंबे, नगरसेवक कुणाल महाजन अमोल भावसार, रवींद्र महाजन आदी उपस्थित होते.